तुर्भे रेल्वे स्थानकात तरुणीचा विनयभंग, पोलिसांच्या सतर्कतेमुळे आरोपी तत्काळ अटकेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2018 05:18 AM2018-02-24T05:18:23+5:302018-02-24T05:18:23+5:30

तुर्भे रेल्वे स्थानकात फलाटावर तरुणीचा विनयभंग होत असल्याची घटना नियंत्रण कक्षातून सीसीटीव्हीवर पाहून सतर्क रेल्वे पोलिसांनी तत्काळ आरोपीला अटक करण्याची घटना गुरुवारी घडली.

Accused of being molested at Turbhe railway station, accused of police alerted immediately | तुर्भे रेल्वे स्थानकात तरुणीचा विनयभंग, पोलिसांच्या सतर्कतेमुळे आरोपी तत्काळ अटकेत

तुर्भे रेल्वे स्थानकात तरुणीचा विनयभंग, पोलिसांच्या सतर्कतेमुळे आरोपी तत्काळ अटकेत

Next

नवी मुंबई : तुर्भे रेल्वे स्थानकात फलाटावर तरुणीचा विनयभंग होत असल्याची घटना नियंत्रण कक्षातून सीसीटीव्हीवर पाहून सतर्क रेल्वे पोलिसांनी तत्काळ आरोपीला अटक करण्याची घटना गुरुवारी घडली.
तक्रारदार २१ वर्षीय तरुणी सकाळी साडेअकरा वाजता ठाण्याकडे जाणाºया लोकलच्या प्रतीक्षेत फलाट क्रमांक
दोनवर उभी असताना पाठीमागून
आलेल्या आरोपीने तिला मिठी मारून विनयभंग केला. या प्रकारामुळे घाबरलेल्या तरुणीने स्वत:ला सावरत आरोपीला
धक्का देत दूर ढकलले. यानंतर आरोपी तेथून निघून गेला.
हा प्रकार घडत असतानाही फलाटावर उपस्थित असलेल्या प्रवाशांपैकी कुणीही तिच्या मदतीला पुढे सरसावले नाही. हा प्रकार आरपीएफचे कॉन्स्टेबल नीलेश दळवी आणि राहुल कुमार यांनी स्थानकातील आरपीएफ कार्यालयात सीसीटीव्ही नियंत्रण कक्षात मॉनिटरवर पाहिला. त्यांनी ही बाब रेल्वे पोलिसांना कळवताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी त्या तरुणीकडे विचारणा केली असता तिने घडलेला प्रकार सांगितला.
पोलिसांनी त्वरित पाठलाग करून आरोपीला सबवेमध्ये ताब्यात घेतले. नरेश के. जोशी (४२) असे आरोपीचे नाव असून, तो घणसोलीचा राहणारा आहे. त्याच्याविरोधात वाशी रेल्वे पोलीस
ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला
आहे. त्याने यापूर्वी कोणासोबत असे प्रकार केले आहेत का, याबाबत पोलीस अधिक माहिती घेत आहेत.



शिवसेना प्रवक्त्या आमदार नीलम गोºहे यांनी रेल्वे सुरक्षा बलाचे निरीक्षक लोकेश सागर यांच्याशी फोनवरून संपर्क साधून घटनेचा आढावा घेतला. या वेळी आरोपी अटक असल्याची माहिती पोलिसांनी वेळीच उघड न केल्याच्या कारणावरूनही त्यांनी तपास यंत्रणेवर ताशेरे ओढले.
तसेच अशा गुन्ह्यांमधील आरोपी न्यायालयातून सहज सुटत असल्याने आरोपी नरेश जोशीला सहज जामीन मिळू नये, यासाठी सरकारी वकिलांमार्फत प्रयत्न करण्याची सूचना त्यांनी रेल्वे पोलिसांना केली.

Web Title: Accused of being molested at Turbhe railway station, accused of police alerted immediately

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.