शहरं
Join us  
Trending Stories
1
Vinod Tawde: हे गँगवॉर असू शकते...; विनोद तावडे प्रकरणात उद्धव ठाकरेंनी व्यक्त केला संशय
2
विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप; बविआचा राडा, निवडणूक आयोगाची पहिली प्रतिक्रिया काय?
3
Amol Kolhe : "पैशाच्या जोरावर महाराष्ट्र जिंकायचा, गुजरातच्या दावणीला बांधायचा"; अमोल कोल्हेंचा भाजपावर हल्लाबोल
4
'पैशासाठी दिल्ली कॅपिटल्सचा संघ सोडलेला नाही...', IPL 2025 लिलावापूर्वी Rishabh Pant च्या पोस्टने खळबळ
5
मतदान एका दिवसावर! महायुती की मविआ?... हे मुद्दे विचारात घेऊन मतदार मत देणार…
6
Vinod Tawde : भाजप नेते विनोद तावडे यांच्यावर निवडणूक आयोगाची कारवाई, पैसे वाटल्याच्या आरोपावरून FIR दाखल
7
मणिपूरमध्ये वाद वाढला, एनडीएचा प्रस्ताव मैतेई संघटनेने फेटाळला; २४ तासांचा अल्टिमेटम दिला
8
“भाजप अन् विनोद तावडेंवर निवडणूक आयोगाने कठोर कारवाई करावी”: बाळासाहेब थोरात
9
Video - डान्स करतानाच नवरदेवाला आला हार्टअटॅक; वराती ऐवजी निघाली अंत्ययात्रा
10
विनोद तावडेंच्या डायरीत १५ कोटी रुपयांची नोंद; क्षितीज ठाकूर यांचा खळबळजनक आरोप
11
संपूर्ण महाराष्ट्रात २० नोव्हेंबरला सरकारी सुट्टी; शेअर बाजार-बँका बंद, पण...
12
शेत, प्लॉट मोजणीचे शुल्क किती, माहितेय का?
13
...अन् शेवटी तावडे आणि ठाकूर एकाच गाडीत बसून गेले; चार तासांत नेमकं काय-काय घडलं?
14
एवढा पैसा आला कुठून? विनोद तावडेंच्या आरोपावरून सुप्रिया सुळेंचा सवाल
15
‘एक है तो सेफ है’ घोषणेवरून लालूप्रसाद यादवांची भाजपासह साधूसंतांवर टीका, म्हणाले...  
16
Vinod Tawde: विनोद तावडे प्रकरणात ९,९३,५०० रुपये रक्कम सापडली; निवडणूक आयोगाची माहिती
17
IPL 2025: मेगा लिलावाआधी १९ वर्षीय मराठमोळ्या खेळाडूची रंगली चर्चा, कोण आहे तो?
18
“गृहखात्याने पाळत ठेवली अन् विनोद तावडे जाळ्यात अडकतील याचा बंदोबस्त केला”; राऊतांचा दावा
19
Vinod Tawde: विनोद तावडे प्रकरण मिटले? हितेंद्र ठाकुरांसोबत एकत्र पत्रकार परिषद होती, पोलिसांनी रोखली
20
कर्तव्यनिष्ठेला सलाम! स्वतःच्या जीवाची पर्वा न करता नर्सने १५ बाळांचा आगीतून वाचवला जीव

राधाकृष्ण नार्वेकर यांना आचार्य अत्रे पुरस्कार

By ऑनलाइन लोकमत | Published: July 16, 2019 12:55 AM

मुंबई मराठी पत्रकार संघातर्फे दिला जाणारा आचार्य अत्रे पुरस्कार यंदा ज्येष्ठ पत्रकार राधाकृष्ण नार्वेकर यांना जाहीर झाला आहे.

नवी मुंबई : मुंबई मराठी पत्रकार संघातर्फे दिला जाणारा आचार्य अत्रे पुरस्कार यंदा ज्येष्ठ पत्रकार राधाकृष्ण नार्वेकर यांना जाहीर झाला आहे. याबाबतची घोषणा पत्रकार संघाचे अध्यक्ष नरेंद्र वाबळे यांनी केली. आचार्य अत्रे जयंतीच्या दिवशी, १३ आॅगस्ट रोजी नार्वेकर यांना हा पुरस्कार देण्यात येईल.मराठी पत्रकारितेत पाच तप कार्यरत राहिलेल्या नार्वेकर यांनी विविध वृत्तपत्रांत बातमीदार, संपादक, सल्लागार संपादक या पदांवर आपला ठसा उमटवला आहे. संपादक पदावरून निवृत्त झाल्यावर नार्वेकर यांनी लिहिलेले सेवानिवृत्त झालात, आता पुढे काय? हे पुस्तक लोकप्रिय ठरले. उर्दू भाषेत त्याचे भाषांतर झाले आहे. हिंदी व इंग्रजी भाषेतही भाषांतर झाले आहे. लवकरच त्याचे प्रकाशन होईल. त्यांनी लिहिलेले ‘मनातली माणसं’ हे पुस्तक प्रकाशित झाले आहे. मुंबईतील अनेक नामवंत पत्रकार आणि संपादक घडविण्यासाठी नार्वेकर यांनी दिलेले योगदान अमूल्य आहे.माथाडी कामगारांना त्यांचे हक्क मिळावे, गिरणी कामगारांना न्याय मिळावा नवी मुंबईमधील प्रकल्पग्रस्तांच्या हक्काचे रक्षण व्हावे, वसई, विरार, मुरबाड, उल्हासनगर, ठाणे, नवी मुंबई, पालघर, शहापूर या शहरांच्या विकासाकरिता विशेष पुरवण्या प्रकाशित करून या शहरांच्या विकासातील आपली जबाबदारी त्यांनी पार पाडली आहे. त्यांनी केलेल्या कामाची दखल शासन पातळीवरदेखील घेतली गेली आहे. दूरदर्शनचा नवरत्न पुरस्कार त्यांना मिळाला आहे.