वर्षभरात ५ लाख वाहनांवर कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 26, 2019 01:48 AM2019-12-26T01:48:28+5:302019-12-26T01:48:51+5:30
वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन : दंड स्वरूपात पाच कोटी ५६ लाख ९२ हजार वसूल
सूर्यकांत वाघमारे
नवी मुंबई : वाहतूक पोलिसांनी चालू वर्षात चार लाख ८९ हजार ९२ वाहनांवर कारवाई केली आहे. वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी विविध हेड अंतर्गत पोलीस आयुक्तालय कार्यक्षेत्रात या कारवाई झाल्या आहेत. त्यांच्याकडून दंड स्वरूपात पाच कोटी ५६ लाख ९२,८०० रुपये वसूल करण्यात आले आहेत. गतवर्षीच्या तुलनेत चालू वर्षात ८२ हजार २६२ जादा कारवाई करण्यात आल्या आहेत.
वाहन अपघातांच्या घटनांना आळा घालण्यासाठी चालकांमध्ये वाहतुकीच्या नियमांची शिस्त लावण्याचा प्रयत्न सातत्याने होत आहे.
त्यानंतरही वाहनचालकांकडून वाहतुकीच्या नियमांची पायमल्ली होताना दिसत आहे. अशा बेशिस्त चालकांवर कारवाईच्या उद्देशाने वाहतूक पोलिसांकडून सातत्याने मोहीम राबवल्या जात आहेत. त्याअंतर्गत चालू वर्षात नोव्हेंबर अखेरपर्यंत चार लाख ८९ हजार ९२ वाहनांवर कारवाई करण्यात आल्या आहेत. २०१८ च्या तुलनेत चालू वर्षात ८२ हजार २६२ जादा कारवाई झाल्या आहेत. यावरून नवी मुंबईसह पनवेल व उरण परिसरात अद्यापही बेशिस्त वाहनचालक मोठ्या प्रमाणात असल्याचे दिसून येत आहे. या कारवार्इंमध्ये विनाहेल्मेट दुचाकी चालवणाऱ्यांचाही मोठा समावेश आहे. अशा ५७ हजार ३४५ दुचाकीस्वारांवर कारवाई करण्यात आली आहे. या कारवाई गतवर्षीच्या तुलनेत ४२ हजार ९४२ ने जास्त आहेत. २०१८ च्या वर्षाखेरीस न्यायालयाने बेशिस्त वाहनचालकांवर मोठ्या प्रमाणात कारवाईच्या सूचना केल्या. त्यानुसार चालू वर्षाच्या सुरुवातीपासूनच नवी मुंबई पोलीस आयुक्तालय कार्यक्षेत्रात वाहतूक पोलिसांकडून सातत्याने कारवाई सुरू आहेत. त्यात ड्रंक अॅण्ड ड्राइव्हच्या कारवार्इंचाही समावेश आहे. मद्यपान करून वाहन चालवल्याने अपघाताचा धोका अधिक असतो. त्यामध्ये स्वत: मद्यपी चालकासह इतर पादचारी अथवा वाहनचालकाचाही अपघात होऊ शकतो; परंतु मद्यपान करून वाहन चालवण्यावर बंदी असतानाही अनेकांकडून मद्यपान करून वाहन चालवत स्वत:सह इतरांचा जीव धोक्यात घातला जातो. अशा २,१९५ चालकांवर कारवाई करण्यात आली आहे. त्यात थर्टीफर्स्ट, गटारी तसेच इतर विशेष दिवशी करण्यात आलेल्या कारवार्इंचाही समावेश आहे. २०१८ मध्ये ड्रंक अॅण्ड ड्राइव्हच्या अवघ्या ९४९ कारवाई करण्यात आल्या होत्या; परंतु चालू वर्षात वाहतूक पोलिसांनी मद्यपान करून वाहन चालवणाऱ्यांवरही कारवार्इंचा धडाका लावला आहे. पुढील आठवड्यात चालू वर्षाला निरोप देत नववर्षाचे जल्लोषात स्वागत केले जाणार आहे. हा जल्लोष साजरा करण्यासाठी रंगणाºया पार्टींमध्ये मद्यपान करून वाहन चालवणाºयांवरही पोलिसांची करडी नजर राहणार आहे, त्यामुळे कारवाईच्या आकड्यात वाढ होणार आहे. वाहनचालकांना वाहतुकीच्या नियमांची शिस्त लावण्यासाठी वाहतूक पोलिसांकडून सातत्याने प्रयत्न केले जात आहेत. त्यानंतरही बेशिस्तपणे वाहने चालवली जात असल्याने रस्त्यांवर वाहतूककोंडीची समस्या भेडसावत आहे.
दोन वर्षांत १३ कोटी वसूल
बेशिस्तपणे वाहन चालवणाºयांवर कारवाई केल्यानंतर त्यांच्याकडून दंडही आकारला जातो. त्यानुसार चालू वर्षात करण्यात आलेल्या एकूण कारवार्इंमध्ये पाच कोटी ५६ लाख ९२ हजार ८०० रुपये दंड वसूल करण्यात आला आहे.
२०१८ मध्ये वाहतूक पोलिसांनी चार लाख सहा हजार ८३० कारवाई केल्या होत्या. त्यांच्याकडून आठ कोटी ४२ लाख ९२ हजार ८९० रुपये दंड वसूल केला होता.
त्यानुसार मागील दोन वर्षांत बेशिस्त वाहनचालकांकडून १३ कोटी ९९ लाख ८५ हजार ६९० रुपये दंड स्वरूपात वाहतूक पोलिसांनी वसूल केले आहेत.
वर्ष २०१८ २०१९ (नोव्हेंबरपर्यंत)
एकूण कारवाई ४,०६,८३० ४,८९,०९२
ड्रंक अॅण्ड ड्राइव्ह ९४९ २,१९५
विनाहेल्मेट १४,४०३ ५७,३४५
वाहतुकीच्या नियमांची पायमल्ली करणाºयांविरोधात कारवाईची मोहीम सातत्याने राबवली जात आहे. त्यानुसार चालू वर्षात नोव्हेंबर अखेरपर्यंत चार लाख ८९ हजार ९२ कारवाई करण्यात आल्या आहेत. वाहनचालकांना शिस्त लागावी या उद्देशाने या कारवाई केल्या जात आहेत. त्यात ड्रंक अॅण्ड ड्राइव्हच्या २१९५ कारवार्इंचा समावेश आहे. थर्टी फर्स्टच्या अनुषंगानेही मोठ्या प्रमाणात अशा कारवाई केल्या जाणार आहेत.
- सुनील लोखंडे, पोलीस उपायुक्त - वाहतूक शाखा.