शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे-पवार-शिंदेंनी मैदान गाजवलं; मात्र सोलापुरात देवेंद्र फडणवीसांची एकही सभा नाही!
2
सत्ताधारी सत्तेसाठी खालच्या थराला जात आहेत; देशमुखांवरील हल्ल्यानंतर शरद पवारांचा संताप
3
"...तर उद्धव ठाकरे यांच्यावर FIR का दाखल होत नाही? त्यांना आत का टाकत नाही?"; रामदास कदम यांचा सवाल
4
'हे' ७ फॉर्म्युले डोक्यात फिट करा, कमाईसोबतच तुमचा पैसाही वाढेल; लोकही विचारतील, "हे कसं केलं?"
5
27000 सैनिक तैनात, अनेक जिल्ह्यात कर्फ्यू, इंटरनेट बंद; मणिपूरमध्ये नेमकं काय घडतंय?
6
भयानक! समुद्रकिनारी बसलेल्या माय-लेकी, अचानक लाट आली अन्...; थरकाप उडवणारा Video
7
विशेष मुलाखत: "संविधानाचे संरक्षण व्हावे यासाठीच आम्ही महायुतीसोबत"
8
Defence Stocks : HAL सह 'या' ३ स्टॉक्सवर ब्रोकरेज बुलिश, ९५ टक्क्यांपर्यंत देऊ शकतात रिटर्न
9
अनिल देशमुखांवरील हल्ला हे रचलेले कुंभाड; भाजपाचा संशय, आजच सखोल चौकशी करण्याची मागणी
10
भाजपावर हल्लाबोल, मनसेची काढली लायकी; अबु आझमींचं कौतुक, संजय राऊत सभेत कडाडले
11
मजबूत जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात तेजी; IT, बँकिंग शेअर्समध्ये मोठी खरेदी
12
ब्राझीलमध्ये नरेंद्र मोदी आणि जॉर्जिया मेलोनी यांच्यात बैठक, 'या' मुद्द्यांवर झाली चर्चा!
13
महाराष्ट्राचं सरकार हे दिल्लीतून चालतंय, सुप्रिया सुळेंचा आरोप 
14
'राहुलजी! आम्ही आणलेली गुंतवणूक बघा'; देवेंद्र फडणवीस यांनी दिले आव्हान
15
Maharashtra Election 2024 Live Updates: राज्यात प्रचारतोफा थंडावल्या, आता मतांची तोफ मतदारांच्या हाती!
16
खोटे आरोप करून सहानुभूती मिळवायचा प्रयत्न : अजित पवार 
17
आधी मलिदा काढला, सत्ता गेल्यावर विरोध सुरू; शिंदेंचा मविआवर घणाघात  
18
स्वेच्छानिवृत्ती किंवा बदली; तिरुपती बालाजी मंदिरातील गैर-हिंदू कर्मचाऱ्यांना स्पष्ट निर्देश
19
महागड्या कर्जामुळे जनता त्रस्त, बँकांनी व्याजदर कमी करण्याची गरज : निर्मला सीतारामन
20
या सगळ्या अफवा! असित मोदींसोबतच्या भांडणावर जेठालालचं स्पष्टीकरण, म्हणाले- "मी हा शो सोडत नाहीये..."

वर्षभरात ५ लाख वाहनांवर कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 26, 2019 1:48 AM

वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन : दंड स्वरूपात पाच कोटी ५६ लाख ९२ हजार वसूल

सूर्यकांत वाघमारे 

नवी मुंबई : वाहतूक पोलिसांनी चालू वर्षात चार लाख ८९ हजार ९२ वाहनांवर कारवाई केली आहे. वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी विविध हेड अंतर्गत पोलीस आयुक्तालय कार्यक्षेत्रात या कारवाई झाल्या आहेत. त्यांच्याकडून दंड स्वरूपात पाच कोटी ५६ लाख ९२,८०० रुपये वसूल करण्यात आले आहेत. गतवर्षीच्या तुलनेत चालू वर्षात ८२ हजार २६२ जादा कारवाई करण्यात आल्या आहेत.वाहन अपघातांच्या घटनांना आळा घालण्यासाठी चालकांमध्ये वाहतुकीच्या नियमांची शिस्त लावण्याचा प्रयत्न सातत्याने होत आहे.

त्यानंतरही वाहनचालकांकडून वाहतुकीच्या नियमांची पायमल्ली होताना दिसत आहे. अशा बेशिस्त चालकांवर कारवाईच्या उद्देशाने वाहतूक पोलिसांकडून सातत्याने मोहीम राबवल्या जात आहेत. त्याअंतर्गत चालू वर्षात नोव्हेंबर अखेरपर्यंत चार लाख ८९ हजार ९२ वाहनांवर कारवाई करण्यात आल्या आहेत. २०१८ च्या तुलनेत चालू वर्षात ८२ हजार २६२ जादा कारवाई झाल्या आहेत. यावरून नवी मुंबईसह पनवेल व उरण परिसरात अद्यापही बेशिस्त वाहनचालक मोठ्या प्रमाणात असल्याचे दिसून येत आहे. या कारवार्इंमध्ये विनाहेल्मेट दुचाकी चालवणाऱ्यांचाही मोठा समावेश आहे. अशा ५७ हजार ३४५ दुचाकीस्वारांवर कारवाई करण्यात आली आहे. या कारवाई गतवर्षीच्या तुलनेत ४२ हजार ९४२ ने जास्त आहेत. २०१८ च्या वर्षाखेरीस न्यायालयाने बेशिस्त वाहनचालकांवर मोठ्या प्रमाणात कारवाईच्या सूचना केल्या. त्यानुसार चालू वर्षाच्या सुरुवातीपासूनच नवी मुंबई पोलीस आयुक्तालय कार्यक्षेत्रात वाहतूक पोलिसांकडून सातत्याने कारवाई सुरू आहेत. त्यात ड्रंक अ‍ॅण्ड ड्राइव्हच्या कारवार्इंचाही समावेश आहे. मद्यपान करून वाहन चालवल्याने अपघाताचा धोका अधिक असतो. त्यामध्ये स्वत: मद्यपी चालकासह इतर पादचारी अथवा वाहनचालकाचाही अपघात होऊ शकतो; परंतु मद्यपान करून वाहन चालवण्यावर बंदी असतानाही अनेकांकडून मद्यपान करून वाहन चालवत स्वत:सह इतरांचा जीव धोक्यात घातला जातो. अशा २,१९५ चालकांवर कारवाई करण्यात आली आहे. त्यात थर्टीफर्स्ट, गटारी तसेच इतर विशेष दिवशी करण्यात आलेल्या कारवार्इंचाही समावेश आहे. २०१८ मध्ये ड्रंक अ‍ॅण्ड ड्राइव्हच्या अवघ्या ९४९ कारवाई करण्यात आल्या होत्या; परंतु चालू वर्षात वाहतूक पोलिसांनी मद्यपान करून वाहन चालवणाऱ्यांवरही कारवार्इंचा धडाका लावला आहे. पुढील आठवड्यात चालू वर्षाला निरोप देत नववर्षाचे जल्लोषात स्वागत केले जाणार आहे. हा जल्लोष साजरा करण्यासाठी रंगणाºया पार्टींमध्ये मद्यपान करून वाहन चालवणाºयांवरही पोलिसांची करडी नजर राहणार आहे, त्यामुळे कारवाईच्या आकड्यात वाढ होणार आहे. वाहनचालकांना वाहतुकीच्या नियमांची शिस्त लावण्यासाठी वाहतूक पोलिसांकडून सातत्याने प्रयत्न केले जात आहेत. त्यानंतरही बेशिस्तपणे वाहने चालवली जात असल्याने रस्त्यांवर वाहतूककोंडीची समस्या भेडसावत आहे.दोन वर्षांत १३ कोटी वसूलबेशिस्तपणे वाहन चालवणाºयांवर कारवाई केल्यानंतर त्यांच्याकडून दंडही आकारला जातो. त्यानुसार चालू वर्षात करण्यात आलेल्या एकूण कारवार्इंमध्ये पाच कोटी ५६ लाख ९२ हजार ८०० रुपये दंड वसूल करण्यात आला आहे.२०१८ मध्ये वाहतूक पोलिसांनी चार लाख सहा हजार ८३० कारवाई केल्या होत्या. त्यांच्याकडून आठ कोटी ४२ लाख ९२ हजार ८९० रुपये दंड वसूल केला होता.त्यानुसार मागील दोन वर्षांत बेशिस्त वाहनचालकांकडून १३ कोटी ९९ लाख ८५ हजार ६९० रुपये दंड स्वरूपात वाहतूक पोलिसांनी वसूल केले आहेत.वर्ष २०१८ २०१९ (नोव्हेंबरपर्यंत)एकूण कारवाई ४,०६,८३० ४,८९,०९२ड्रंक अ‍ॅण्ड ड्राइव्ह ९४९ २,१९५विनाहेल्मेट १४,४०३ ५७,३४५वाहतुकीच्या नियमांची पायमल्ली करणाºयांविरोधात कारवाईची मोहीम सातत्याने राबवली जात आहे. त्यानुसार चालू वर्षात नोव्हेंबर अखेरपर्यंत चार लाख ८९ हजार ९२ कारवाई करण्यात आल्या आहेत. वाहनचालकांना शिस्त लागावी या उद्देशाने या कारवाई केल्या जात आहेत. त्यात ड्रंक अ‍ॅण्ड ड्राइव्हच्या २१९५ कारवार्इंचा समावेश आहे. थर्टी फर्स्टच्या अनुषंगानेही मोठ्या प्रमाणात अशा कारवाई केल्या जाणार आहेत.- सुनील लोखंडे, पोलीस उपायुक्त - वाहतूक शाखा.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीNavi Mumbaiनवी मुंबईPoliceपोलिस