वर्षभरात  एक लाख बेशिस्त वाहनचालकांवर कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 4, 2021 12:56 AM2021-01-04T00:56:43+5:302021-01-04T00:56:49+5:30

पळस्पे पोलीस मदत केंद्रातील अधिकाऱ्यांनी कसली कंबर 

Action against one lakh unruly drivers during the year | वर्षभरात  एक लाख बेशिस्त वाहनचालकांवर कारवाई

वर्षभरात  एक लाख बेशिस्त वाहनचालकांवर कारवाई

Next


मयूर तांबडे
लोकमत न्यूज नेटवर्क
नवीन पनवेल : महामार्ग पोलीस केंद्र पळस्पे मार्फत २०२०मध्ये १ लाख ६ हजार २४ वाहनचालकांवर चलनादवारे कारवाई करण्यात आली आहे. विहीत मर्यादेपेक्षा अधिक वेगाने वाहन चालविणाऱ्या बेशिस्त वाहनचालकांवर कारवाई करण्यासाठी पळस्पे पोलीस मदत केंद्राकडील अधिकारी अंमलदार यांनी कंबर कसली आहे.
अप्पर पोलीस महासंचालक डॉ.भूषणकुमार उपाध्याय यांच्या आदेशाप्रमाणे चालकांचे प्रबोधन व बेशिस्त चालकांवर कारवाई अशी विशेष मोहीम हाती घेण्यात आली आहे. या मोहिमेंतर्गत सन २०२० मध्ये इंटरसेप्टर वाहनादूवारे व मुंबई पुणे द्रुतगती मार्गावर वेगवेगळ्या ठिकाणी बसविण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेरामार्फत अतिवेगाने वाहन चालविणाऱ्या ४१ हजार ७३८ वाहनांवर कारवाई करण्यात आली. सीट बेल्ट न लावणे, मोबाइल संभाषण, लेन कटिंग, काळ्या काचा, रिफ्लेक्टर नसलेल्या वाहनांवर, तसेच इतर मो.वा.का.कलमांतर्गत ६४ हजार २८६ वाहनांवर कारवाई करण्यात आली आहे.
राज्यातील महामार्गावर अपघाताचे प्रमाण कमी व्हावे, याकरिता डॉ.भूषणकुमार उपाध्याय अपर पोलीस महासंचालक वाहतूक महाराष्ट्र राज्य मुंबई, यांनी दिलेल्या सूचनांप्रमाणे सुनिता साळुंखे-ठाकरे, पोलीस अधीक्षक (मुख्यालय) व डॉ.दिगंबर प्रधान, पोलीस अधीक्षक महामार्ग पोलीस ठाणे परिक्षेत्र ठाणे, संजय बारकुंड पोलीस अधीक्षक, महामार्ग पोलीस रायगड परिक्षेत्र, तसेच सुदाम पाचोरकर पोलीस निरीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई करण्यात आली. सपोनि सुभाष पुजारी, महामार्ग पोलीस केंद्र पळस्पे यांनी मुंबई पुणे द्रुतगती मार्गावर होणाऱ्या अपघातांचे मुख्य कारण हे वेग मर्यादेचे उल्लंघन असल्याचे निष्पन्न झाल्याचे सांगितले.
महामार्ग पोलीस केंद्र पळस्पेचे अधिकारी व अंमलदार यांचेकडून करण्यात येणाऱ्या दंडात्मक कारवाई, तसेच वाहनचालकांचे करण्यात आलेल्या प्रबोधनामुळे मुंबई पुणे द्रुतगती मार्गावर प्राणांतिक अपघातामध्ये सन २०२० मध्ये सन २०१९पेक्षा ४० टक्क्यांपेक्षा अपघात कमी झालेले दिसून येत आहेत.

वाहतुकीच्या नियमांबाबत जनजागृती 
n कोरोना संसर्ग काळामध्ये काळात महामार्ग केंद्राच्या वतीने महामार्ग पोलीस अंमलदारांना, तसेच महाराष्ट्र सुरक्षा बलातील कर्मचारी व देवदूत कर्मचारी आणि वाहनचालकांना सॅनिटायझर्स, मास्क शिल्ड, हॅन्डग्लोव्हज यांचे मोठ्या प्रमाणात वाटप करण्यात आले. महामार्ग पोलीस केंद्र पळस्पेकडून अपघात कमी व्हावे, वाहतूक नियमनाबाबत जनजागृती व्हावी, 
n याकरिता वेळोवेळी चौक सभा आयोजित करून वाहन पार्किंग स्थळे, कळंबोली ट्रक टर्मिनल, लॉजिस्टिक्स, खालापूर टोल नाका येथे कार्यक्रम घेऊन वाहतूक नियमांबाबतच्या माहितीबाबतची एका वर्षात ७५,००० पत्रके वाटण्यात आली. वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्यामुळे होणाऱ्या अपघाताबाबत माहिती देऊन  सूचना करण्यात येतात.

वाहतुक नियमांचे उल्लंघन केल्यास करण्यात येणा-या दंडात्म्क कारवाईबाबतची माहीती देवुन वाहनचालकांचे प्रबोधन करण्यात येत असते.
- सुभाष पुजारी, सहा. पोलीस निरीक्षक, महामार्ग पोलीस केंद्र पळस्पे

Web Title: Action against one lakh unruly drivers during the year

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.