मार्जिनल स्पेसचा गैरवापर करणाऱ्यांवर कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 8, 2019 01:44 AM2019-11-08T01:44:16+5:302019-11-08T01:44:24+5:30

महापालिकेची मोहीम : दोन ट्रक साहित्य जप्त; सर्व विभागांत कारवाई होणार

Action against those who misuse marginal space | मार्जिनल स्पेसचा गैरवापर करणाऱ्यांवर कारवाई

मार्जिनल स्पेसचा गैरवापर करणाऱ्यांवर कारवाई

Next

नवी मुंबई : शहरातील दुकानांसमोरील मोकळ्या जागा व्यावसायिकांनी व्यापल्या आहेत; त्यामुळे नागरिकांना ये-जा करताना विविध समस्यांना सामोरे जावे लागते. तुर्भे येथील माथाडी भवन ते मर्चंट चेंबर परिसरात मार्जिनल स्पेसचा गैरवापर करणाºया व्यवसायिकांवर महापालिकेच्या तुर्भे विभागाच्या वतीने गुरु वारी ७ नोव्हेंबर रोजी कारवाई करण्यात आली. धकड कारवाई करीत एकूण दोन ट्रक साहित्य जप्त केले.

तुर्भे एपीएमसी मार्केटमध्ये खरेदीसाठी ग्राहकांची मोठी वर्दळ असते. या परिसरातील दुकानदारांनी दुकांसमोरील मोकळ्या जागांवर अतिरिक्त व्यसयाय करण्याच्या अनुषंगाने विविध व्यवसाय थाटले आहेत. माथाडी भवन ते मर्चंट चेंबर या वाणििज्यक संकुलातही दुकानदार मार्जिनल स्पेसचा गैरवापर करु न या जागेत व्यवसाय करत असल्याने रहदारीला अडथळा निर्माण होत होता. याबाबत महापालिकेचे तुर्भे विभाग अधिकारी समीर जाधव यांच्याकडे तक्र ारी प्राप्त झाल्या होत्या. तक्र ारींच्या अनुषंगाने या परिसरातील 25 ते 30 व्यवसायिकांवर कारवाई करण्यात आली या कारवाईमध्ये दोन ट्रक साहित्य जप्त करण्यात आले. एपीएमसी पोलिसांच्या बंदोबस्तात ही कारवाई करण्यात आली. मार्जिनल स्पेसचा गैरवापर करणार्यांवर, तसेच पदपथ आण िरस्त्यावर अनिधकृतपणे व्यवसाय करणार्यांवर सातत्याने कारवाया केल्या जाणार असल्याचे जाधव यांनी सांगितले.
 

Web Title: Action against those who misuse marginal space

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.