बाजार समितीमधील बेशिस्त कर्मचाऱ्यांवर होणार कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 16, 2019 11:38 PM2019-12-16T23:38:16+5:302019-12-16T23:38:19+5:30

विशेष पथकाची नियुक्ती : पूर्णवेळ कार्यालयात नसणाऱ्यांचे होणार सर्वेक्षण

Action to be taken against specialist staff of the Market Committee | बाजार समितीमधील बेशिस्त कर्मचाऱ्यांवर होणार कारवाई

बाजार समितीमधील बेशिस्त कर्मचाऱ्यांवर होणार कारवाई

googlenewsNext

नवी मुंबई : मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमधील बेशिस्त कर्मचाºयांवर कठोर कारवाई करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. उशिरा कामावर येणाºया व लवकार निघून जाणाºयांसह कार्यालयीन वेळेत बाहेर जाणाºयांवर लक्ष ठेवण्यासाठी समिती नियुक्त केली आहे. जे अधिकारी व कर्मचारी बेशिस्तपणे वागताना दिसतील त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार आहे.


आशिया खंडातील सर्वात मोठी सहकारी बाजारपेठ अशी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीची ओळख आहे. त्याचपद्धतीने राज्यात अधिकारी व कर्मचाºयांना सर्वाधिक वेतन देणारी संस्था म्हणूनही राज्यभर ओळख आहे. वेतन चांगले असले तरी काही अधिकारी व कर्मचारी दिलेले काम वेळेत व योग्यपद्धतीने करत नाहीत. कामचुकारपणा करणाºयांचे प्रमाण वाढत होते. सकाळी दहा ते पावणेसहा ही कार्यालयाची वेळ आहे. गेट व इतर ठिकाणच्या कर्मचाºयांना तीन पाळ्यांमध्ये जबाबदारी विभागून देण्यात आली आहे. अनेक कर्मचारी उशीरा कामावर येतात. लवकर घरी निघून जातात. कामावर आल्यानंतरही ते कामाच्या जागेवर दिसत नाहीत. मार्केटमध्ये अनावश्यकपणे फिरताना दिसत असतात. काहीजण स्वत:ची वैयक्तीक कामे करण्यासाठी निघून जातात. मागील काही महिन्यामध्ये हा बेशीस्तपणा वाढला आहे. याविषयी सचिव व प्रशासकांकडेही तक्रारी करण्यात आल्या होत्या. याची गंभीर दखल सचिव अनिल चव्हाण यांनी घेतली आहे. बेशीस्तपणा करणाºयांवर नियंत्रण ठेवण्यासाठी दोन सदस्यांचे पथक नियुक्त केली आहे.

ई नाम योजनेचे उपसचिव सुनिल सिंगतकर व प्र.उपसचिव आस्थापनाचे के आर पवार या दोघांचा या पथकामध्ये समावेश आहे. सर्व अधिकारी व कर्मचारी कार्यालयीन वेळेत नियुक्त केलेल्या जागेवर आहेत का हे या पथकाने पहावयाचे आहे. यासाठी अचानकपणे विविध विभागामध्ये जावून पाहणी करण्याच्या सूचना त्यांना करण्यात आल्या आहेत. जे अधिकारी व कर्मचारी त्यांना नियुक्त केलेल्या जागेवर आढळणार नाही. हालचाल रजिस्टरमध्ये ते कोठे गेले याची नोंद नसेल तर त्याविषयी अहवाल मुख्यालयास पाठविण्याचे आदेशही त्यांना देण्यात आले आहेत.
दबाव आणण्यास सुरुवात
बेशीस्तपणावर लक्ष ठेवण्यासाठी सचिवांनी दोन अधिकाºयांचे पथक तयार केले आहे. या पथकाने काही कर्मचाºयांना उशीरा येणारे व लवकर जाणारे काही कर्मचारी निदर्शनास आले. त्यांच्याविषयी वरिष्ठांना कळविल्याचा राग आल्याने काहींनी अधिकाºयांची हुज्जत घालून दबाव आणल्याची चर्चा मार्केटमध्ये होती. अशाप्रकारे

नियम सर्वांसाठी सारखे असावे
बाजारसमितीमध्ये काही अधिकारी व कर्मचारी प्रामाणिकपणे काम करतात. कार्यालयीन वेळेव्यतिरिक्तही जादा काम करत असल्याचे पहावयास मिळते. काही कर्मचारी मात्र कामापेक्षा टाईमपास करतात. उशीरा यायचे व सह्या करून वैयक्तीक कामासाठी निघून जाण्याचे प्रकार वाढत आहेत. कार्यायलीने वेळेत अनेक खुर्च्या रिकाम्या असल्याचे पहावयास मिळते. बेशिस्तपणा करणाºयांवर निष्पक्षपणे कारवाई करण्यात यावी. कोणालाही सूट देवू नये असे मागणीही केली जात आहे. कोणी दबाव आणण्याचा प्रयत्न केल्यास त्यांच्यावरही कारवाई करण्यात यावी अशी प्रतिक्रिया काही दक्ष कर्मचाºयांनी व्यक्त केली आहे.

मुंबई कृषी उत्पन्न बाजारसमिती आवारामध्ये पाच मार्केट आहेत. काही अधिकारी व कर्मचारी उशीरा कामावर येतात व लवकर निघून जातात अशा तक्रारी येऊ लागल्या होत्या. बेशीस्तपणा कमी होवून कामकाज गतीने व्हावे यासाठी दोन अधिकाºयांचे पथक नियुक्त केले आहे. कर्मचारी बेशीस्तपणे वागत असल्याचे निदर्शनास आल्यास त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार आहे.
- अनिल चव्हाण, सचीव
मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती

Web Title: Action to be taken against specialist staff of the Market Committee

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.