नवी मुंबई : जुहुगावातील अनधिकृत इमारतीवर महापालिकेने शनिवारी कारवाई केली. या ठिकाणी विनापरवाना बांधकाम करण्यात येत असल्याने त्याविषयी पालिकेकडे तक्रार करण्यात आली होती. तक्रारीची दखल घेवून बांधकाम पाडण्यात आले. येथे वृंदावन सोसायटी या नावाने बहुमजली इमारतीचे बांधकाम सुरू करण्यात आले होते. इमारतीचे बांधकाम करण्यासाठी पालीकेची परवानगी घेण्यात आली नव्हती. जुने बांधकाम तोडून नवीन इमारत बांधताना बाजूला मोकळी जागाही सोडण्यात आली नव्हती. सार्वजनीक वापराच्या जागेवरही अतिक्रमण करण्यात आले असल्याने याविषयी महापालिकेकडे तक्रार केली होती. या तक्रारीची दखल घेवून विभाग अधिकारी महेंद्रसिंग ठोके यांनी यापुर्वी अनेक वेळा बांधकाम थांबविण्याची नोटीस दिली होती. पण या नोटीसकडे दुर्लक्ष करून इमारतीचे बांधकाम सुरूच ठेवले होते. तिन मजल्याचे बांधकाम पुर्ण होवून चौथ्या मजल्यावरील भिंतीचे बांधकाम करण्यात येत होते. महापालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथकाने शनिवारी वृंदावन सोसायटीच्या अतिक्रमणावर कारवाई केली. इमारतीचे बांधकाम हटविण्यास सुरवात झाली आहे. इमारतीचे बांधकाम पुर्णपणे निष्कासीत करण्यात यावे अशी मागणी करण्यात आली आहे. या कारवाईच्या वेळी मोठ्याप्रमाणात बंदोबस्त ठेवण्यात आला होता. (प्रतिनिधी)
जुहुगावातील इमारतीवर कारवाई
By admin | Published: January 23, 2017 5:50 AM