शहरं
Join us  
Trending Stories
1
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
2
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
3
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
4
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
5
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
6
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
7
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
8
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
9
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
10
ढगाळ हवामानामुळे मुंबईत थंडी पळाली; बदलत्या हवामानाचा परिणाम
11
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
12
लॉटरी किंगकडून आठ कोटींची रक्कम जप्त
13
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
14
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
15
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
16
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
17
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
18
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
19
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
20
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा

सिडकोची सुरक्षारक्षकांवर कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2018 1:04 AM

१२ प्रकल्पग्रस्तांच्या दगडखाणीचा परवानाही रद्द करण्याची कारवाई सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक भूषण गगराणी यांनी केली आहे.

कमलाकर कांबळे ।नवी मुंबई : सिडकोच्या सेवेत राहून ही आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पाला अप्रत्यक्षपणे विरोध करणाऱ्या ४७ प्रकल्पग्रस्त सुरक्षारक्षकांची सिडकोने सेवा खंडित केली आहे. त्याचबरोबर १२ प्रकल्पग्रस्तांच्या दगडखाणीचा परवानाही रद्द करण्याची कारवाई सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक भूषण गगराणी यांनी केली आहे.देशाचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे काम प्रगतिपथावर आहे. सध्या दहा गावांच्या स्थलांतराचा प्रश्न कळीचा बनला आहे. दहा गावांतील ३००० कुटुंबांपैकी आतापर्यंत जवळपास १००० कुटुंबांनी स्थलांतरण केले आहे. उर्वरित कुटुंबांना मे २०१८ ची अंतिम मुदत देण्यात आली आहे. विशेष म्हणजे, स्थलांतरित होणाºया या दहा गावांतील अनेक तरुण विविध पदावर सिडकोच्या सेवेत आहेत. त्यामुळे सेवेचा लाभ घेणाºया प्रकल्पग्रस्तांनी सर्वप्रथम आपली घरे स्थलांतरित करावीत, अशी सिडकोची भूमिका आहे; परंतु सेवेचा लाभ ही घ्यायचा आणि सिडकोच्या धोरणाला विरोधही करायचा, अशा दुहेरी भूमिकेत वावरणाºया कर्मचाºयांची सिडकोने झडाझडती सुरू केली आहे. याचाच एक भाग म्हणून सोमवारी ४७ सुरक्षारक्षकांची सेवा तडकाफडकी खंडित करण्यात आली. हे सर्व सुरक्षारक्षक स्थलांतरित होणाºया दहा गावांतील रहिवासी आहेत. १५ दिवसांपूर्वी सिडकोचे मुख्य दक्षता अधिकारी विनय कारगांवकर यांनी या सुरक्षारक्षकांना बोलावून घरे रिकामी करा, किंवा नोकरी सोडा, असा सल्ला दिला होता. सुरक्षारक्षकांशी संवाद साधतानाचा कारगांवकर यांचा व्हिडीओ व्हायरल झाल्याने एकच खळबळ उडाली होती; परंतु सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक भूषण गगराणी यांनी कारगांवकर यांची पाठराखण करीत त्यांच्या भूमिकेचे समर्थन केले होते. इतकेच नव्हे, तर सेवेत राहून सिडकोच्या प्रकल्पांना आणि धोरणाला विरोध करणाºया कर्मचाºयांची गय केली जाणार नाही, असा इशारा दिला होता. त्यानुसार सोमवारी त्या ४७ सुरक्षारक्षकांची सिडकोतील सेवा खंडित करून त्यांना पुन्हा सुरक्षारक्षक मंडळाकडे वर्ग करण्यात आले आहे. कर्तव्यात कसूर, वरिष्ठांच्या आदेशाचा अवमान करणे, गोपनीयतेचा भंग आणि सिडकोच्या ध्येयधोरणांशी अप्रामाणिक वर्तनाचा ठपका ठेवून, या सुरक्षारक्षकांवर ही कारवाई करण्यात आली आहे.१२ दगडखाणीचे परवाने केले रद्दपुनर्वसनाचा एक भाग म्हणून सिडकोने प्रकल्पग्रस्तांना उलवे परिसरात दगडखाणीचे परवाने दिले आहेत. यातील बहुतांशी प्रकल्पग्रस्त स्थलांतरीत होणाºया दहा गावांतील आहेत. त्यामुळे या दगडखाण मालकांनी प्राधान्याने स्थलांतराचा मार्ग स्वीकारावा आणि इतरांनाही प्रोत्साहित करावे, असे सिडकोला वाटते.सिडकोने दिलेल्या दगडखाणीही चालवायच्या आणि स्थलांतराला विरोधही करायचा, अशी दुहेरी भूमिका काही दगडखाणचालकांनी घेतल्याचे सिडकोच्या निदर्शनास आले. त्यानुसार सोमवारी या परिसरातील प्रकल्पग्रस्तांच्या १२ दगडखाणीचे परवाने रद्द करण्यात आल्याची माहिती गगराणी यांनी ‘लोकमत’ला दिली. या कारवाईतून बेशिस्तपणा खपवून घेतला जाणार नसल्याचे सिडकोने स्पष्ट केले आहे.

टॅग्स :cidcoसिडको