ऐरोलीमध्ये बांधकामांवर कारवाई
By admin | Published: January 14, 2017 07:08 AM2017-01-14T07:08:03+5:302017-01-14T07:08:03+5:30
ऐरोली सेक्टर १ ते २० दरम्यान ८ भुखंडावरील अनधिकृत बांधकामांवर सिडकोने कारवाई केली. कारवाई दरम्यान विरोध होवू नये
नवी मुंबई : ऐरोली सेक्टर १ ते २० दरम्यान ८ भुखंडावरील अनधिकृत बांधकामांवर सिडकोने कारवाई केली. कारवाई दरम्यान विरोध होवू नये यासाठी कडक बंदोबस्त ठेवल्याने परिसराता पोलीस छावणीचे स्वरूप प्राप्त झाले होते.
सेक्टर १ मध्ये संजय भोसले यांनी ९४० चौरस मीटर क्षेत्रफळावर आरसीसी बांधकाम सुरू केले होते. सेक्टर २ मध्ये ४८ चौरस मीटर क्षेत्रफळावर दुर्गामाता विश्वस्त मंडळाने केलेले पत्र्याचे बांधकाम हटविण्यात आले. सेक्टर २० मध्ये उच्चदाबाच्या वीजवाहीनीखाली बी आर बिडवई, बी आर पांडे यांनी जय भवानी जेष्ठ नागरीक सेवा संस्थेचे कार्यालय तयार केले होते. याशिवाय ५५ चौरस मीटर क्षेत्रफळावर राजकीय पक्षांनी दोन गाळे तयार केले होते. ते गाळेही हटविण्यात आले आहेत. याशिवाय सिद्धीविनायक मित्र मंडळाने बांधलेले पत्रा शेड, विश्वशांती बुद्ध विहाराचे बांधकामही हटविण्यात आले आहे.
अतिरिक्त जिल्हाधिकारी शिवराज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली जी के जंगम, जी एस झिने, एस एस कडव, एम. सी. माने यांच्या पथकाने ही कारवाई केली. कारवाई दरम्यान कोणताही अनुचीत प्रकार होवू नये यासाठी वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रदिप तिदार यांच्यासह २ अधिकारी व १०० कर्मचारी बंदोबस्तासाठी तैनात केले होते. (प्रतिनिधी)