शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा सिद्दिकी हत्याकांडातील चौथ्या आरोपीची ओळख पटली; पोलीस जसीन अख्तरच्या मागावर
2
Baba Siddique : 'ती' पोस्ट करणारा अकोल्याचा शुभम लोणकर भावासह फरार, पोलिसांकडून शोध
3
Baba Siddique यांना खरंच वाय दर्जाची सुरक्षा होती का? अखेर उत्तर मिळालं
4
नाशिकमध्ये अग्निवीरांचा मृत्यू; राहुल गांधींचे पंतप्रधान मोदी-राजनाथ सिंहांना तीन सवाल
5
'महाराष्ट्र राजकीय परिवर्तनासाठी सज्ज', विधानसभा निवडणुकीबाबत शरद पवारांचे मोठे वक्तव्य
6
१६ ऑक्टोबरला नवीन पल्सर लाँच होणार? पहिल्या सीएनजी बाईकला टक्कर देणार!
7
चांदीने १ लाखाचा टप्पा केला पार; जाणून घ्या कोणत्या शहरात किती दर?
8
बाबा सिद्दिकी हत्या : एका आरोपीला पोलीस कोठडी, तर दुसऱ्याला..., न्यायालयाचा आदेश काय?
9
बाबा सिद्दिकी हत्येप्रकरणी केली फेसबुक पोस्ट; पोलिस घरी पोहोचले, त्याआधीच शुभम झाला गायब
10
Baba Siddique : "२०१९ ला जेलमध्ये गेला, जामीन कसा मिळाला माहीत नाही; ११ वर्षांपूर्वीच घरातून हाकलून दिलं"
11
"उद्धव ठाकरे, सारखं वाघनखं काढतंय; एकनाथ शिंदे, ते एक पुष्पा वेगळंच"; राज ठाकरे बरसले
12
"मी तुमचा चित्रपट बनवेन - एक था MLA", दाऊद इब्राहिमनं एकदा बाबा सिद्दिकींना दिली होती धमकी
13
मोदींच्या 'त्या' विधानावर शरद पवारांनी ठेवलं बोट; म्हणाले, "आम्ही बदनामी करू इच्छित नाही, पण..."
14
"धानाला हेक्टरी २५ हजार रुपये बोनस देणार", देवेंद्र फडणवीसांची ग्वाही
15
"मी त्यांना कधीही हसताना..."; रतन टाटांच्या निधनाच्या तीन दिवसानंतर शंतनु नायडूंनी केली भावूक पोस्ट
16
"मला एक खून माफ करा...", राज ठाकरेंची थेट राष्ट्रपतींकडे विनंती; मेळाव्यात असं का म्हणाले?
17
Baba Siddique : "पुण्याला जातो सांगितलं, माझा मुलगा..."; बाबा सिद्दिकींची हत्या करणाऱ्या शिवाच्या आईची प्रतिक्रिया
18
'या लोकांना संपूर्ण देशात गुंडा राज आणायचे आहे', बाबा सिद्दिकी हत्याकांडावर केजरीवाल संतापले
19
"गृहमंत्र्यासोबत मुख्यमंत्र्यांची जबाबदारी आम्ही नाकारत नाही"; बाबा सिद्दिकींच्या हत्येवरुन शिंदे गटाचे मंत्री स्पष्टच बोलले
20
झोपडीत राहिला, ४० रुपयांसाठी केली मजुरी; पंचायत फेम अभिनेत्याने सांगितला संघर्षमय काळ

तुर्भेतील अतिक्रमणावर कारवाई

By admin | Published: February 07, 2017 4:22 AM

तुर्भे नाक्यावर फेरीवाल्यांसह रिक्षा चालकांनी केलेल्या अतिक्रमणामुळे दोन तरूणांचा मृत्यू झाला आहे.

नवी मुंबई : तुर्भे नाक्यावर फेरीवाल्यांसह रिक्षा चालकांनी केलेल्या अतिक्रमणामुळे दोन तरूणांचा मृत्यू झाला आहे. याविषयी ‘लोकमत’ने आवाज उठविताच पालिका प्रशासनाने फेरीवाल्यांविरोधात जोरदार मोहीम सुरू केली असून पोलिसांनी बेशिस्त रिक्षा चालक व डंपरचालकांविरोधात दंडात्मक कारवाई सुरू केली आहे. नवी मुंबईमधील सर्वाधिक वाहतूक कोंडी तुर्भे नाक्यावर होत आहे. एमआयडीसीकडे जाणाऱ्या रोडवर एक बाजूला दोन लेनवर भाजी, फळ व इतर फेरीवाल्यांनी अतिक्रमण केले होते. याशिवाय पदपथावरही दुकानदारांनी आणि फेरीवाल्यांनी ठाण मांडले आहे. रोडच्या दोन्ही बाजूला रिक्षा चालकांनी अनधिकृत स्टँड तयार केले आहे. रोडच्या मध्यभागी व बसस्टॉपवरही रिक्षाचालकांनी अतिक्रमण केले आहे. एकच लेन वाहतुकीसाठी उपलब्ध असून बस रोडच्या मध्येच उभी करावी लागत असल्याने वारंवार वाहतूक कोंडी होवू लागली होती. येथील मटण व इतर दुकानदारांनीही अतिक्रमण केले आहे. या सर्व अतिक्रमणांमुळे गत आठवड्यात दोन तरूणांचा मृत्यू झाला होता. रविवारी पुन्हा या परिसरात अपघात होवून दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. डंपर व्यावसायिकांनी रस्त्यावर वाहने उभी केल्यानेही वाहतूक कोंडीमध्ये भर पडत होती. ‘लोकमत’ने तुर्भे नाक्यावरील वाहतूक कोंडीच्या समस्येवर प्रकाश टाकल्यानंतर तुर्भेच्या विभाग अधिकारी अंगाई साळुंखे यांनी येथील फेरीवाल्यांवर जोरदार कारवाई सुरू केली आहे. रोज सकाळी येथील विक्रेत्यांवर कारवाई केली जात आहे. वाहतूक पोलिसांनी बेशिस्त रिक्षा चालकांवर व डंपर चालकांवर कारवाई सुरू केली आहे. वाहतूक पोलीस व पालिकेच्या धडक मोहिमेमुळे २५ वर्षांमध्ये प्रथमच नाक्यावर रस्ते अतिक्रमणमुक्त झाले आहेत. वाहतूक कोंडीचा प्रश्न सुटल्याने रहिवाशांनी समाधान व्यक्त केले आहे. पुन्हा येथे फेरीवाल्यांनी अतिक्रमण करू नये यासाठी नियमित कारवाई सुरू ठेवावी, अशी मागणी केली जात आहे.