नवी मुंबई : महापालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथकाने कोपरखैरणे व घणसोलीमधील अनधिकृत बांधकामावर कारवाई करण्यात आली. तीन मजली इमारतीसह ८ बैठी घरे निष्कासीत केली आहेत. कोपरखैरणे विभाग कार्यालयाच्या क्षेत्रात भूखंड क्रमांक ३९ वर राजाराम मालजी नाईक यांनी तीन मजली इमारतीचे बांधकाम सुरू केले होते. परवानगी न घेता बांधकाम केले जात असल्याने या अतिक्रमणावर पालिकेने कारवाई केली. यावेळी मोठ्या प्रमाणात बंदोबस्त ठेवण्यात आला होता. याशिवाय घणसोलीमधील अर्जुनवाडी येथील ८ अनधिकृत घरांवरही कारवाई करण्यात आली आहे. सिडकोचे अनधिकृत बांधकाम नियंत्रक शिवराज पाटील व महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या मार्गदर्शनाखाली उपआयुक्त डॉ. कैलास गायकवाड यांच्या नियंत्रणाखाली सिडकोचे पी. बी. राजपूत, गणेश झीने, कोपरखैरणेचे विभाग अधिकारी अशोक मढवी, घणसोलीचे दत्तात्रय नांगरे यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे.
अतिक्रमणावर कारवाई
By admin | Published: January 25, 2017 5:04 AM