महावितरणच्या भांडूप परिमंडळात वीजबिल वसुलीची धडक कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 18, 2022 04:54 PM2022-11-18T16:54:12+5:302022-11-18T16:54:43+5:30
नोव्हेंबर महिन्यात वीज बिल न भरणाऱ्या ६,४७४ ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित
नवी मुंबई : महावितरणच्या भांडूप परिमंडलातील पेण, ठाणे व वाशी मंडळात विविध वर्गवारीतील उच्चदाब व लघुदाब ग्राहकांची एकूण थकबाकी ३११ कोटीची आहे. यामध्ये,चालू बिल जोडल्यास सदर थकबाकी ६७५ कोटीच्या घरात आहे. महावितरणवर थकबाकीचा डोंगर वाढत असल्यामुळे व वीज ग्राहक वीजबिल भरणावर दुर्लक्ष करीत असल्यामुळे, महावितरणची आर्थिक स्थिती बिगडत आहे. विविध माध्यमातून वारंवार विनंती करूनही अनेक ग्राहकांनी आपले वीज बिल भरले नाहीत. सध्या, कंपनीची आर्थिक स्तिथी अत्यंत वाईट असून नाईलाजाने महावितरणला ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित करावा लागत आहे. कोंकण प्रादेशिक कार्यालयाचे सह व्यवस्थापकीय संचालक चंद्रकांत डांगे यांच्या आदेशानुसार वसुलीची धडक मोहीम भांडूप परिमंडलाने सुरु केली असून त्यांनी वीजबिल थकबाकीदारांचा वीजपुरवठा त्वरित खंडित करण्याचे आदेश सर्व क्षेत्रीय कार्यालयांना दिले आहेत . त्यानुसार, १ नोव्हेंबर पासून ते १५ नोव्हेंबर या कालावधीत ६,४७४ ग्राहकांचा वीजपुरवठा तात्पुरता खंडित करण्यात आला आहे.
भांडूप परिमंडलात घरघुती ग्राहकांची थकबाकी – ५१.८९ कोटी, वाणिज्यिक ग्राहकांची थकबाकी – २४.७२ कोटी, औद्योगिक ग्राहकांची थकबाकी – ५१.५२ कोटी, कृषी ग्राहकांची- २.२१ कोटी, स्ट्रीटलाईटची थकबाकी- १६८.२० कोटी, पाणी पुरवठा योजनांची थकबाकी ५.५५ कोटीवर तर इतर ग्राहकांची थकबाकी – ८.४५ कोटी झाली आहे. कोंकण प्रादेशिक कार्यालयाचे सह व्यवस्थापकीय संचालक चंद्रकांत डांगे यांच्या आदेशानुसार, भांडुप परिमंडलचे मुख्य अभियंता शधनंजय औंढेकर यांनी परिमंडलांतर्गत सर्व कार्यालयांना धडक कारवाई सुरु करण्याचे निर्देश दिले असून, आतापर्यंत ६४७४ ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे. यामध्ये ठाणे मंडळात १८१५ , वाशी मंडळात ३०८७ तर पेण मंडळात १५७२ ग्राहकांचा समावेश आहे.
मुख्य अभियंता औंढेकर म्हणाले की, “ महावितरण ग्राहकांना उत्तम सेवा देण्यासाठी नेहमी तत्पर असते. आपल्या जीवाची परवा न करता महावितरणचे कर्मचारी ग्राहकांना अखंडित वीजपुरवठा करण्यासाठी झटत असतात. ग्राहकांना वारंवार विनंती करून ही थकबाकीदार ग्राहक वीज बिल भारत नाही. महावितरणची थकबाकी वाढत असल्यामुळे आर्थिक परिस्थिती बघता नाईलाजाने महावितरणला वीजपुरवठा खंडित करण्याची वेळ आली आहे. वीज पुरवठा खंडित होऊ नये म्हणून ग्राहकांनी वीजबिल भरून महावितरणाला सहकार्य करावे. सध्या महावितरणच्या कँश कलेक्शन सेंटर शनिवार व रविवार सुद्धा चालू ठेवण्यात आले आहेत. तरी,सर्व ग्राहकांनी याचा लाभ घ्यावा. याशिवाय, महावितरणच्या संकेत स्थळावर किंवा महावितरण मोबाईल अँप द्वारे ही वीजबिल भरता येते.