शहरं
Join us  
Trending Stories
1
१०५ काँग्रेस, ९५ उद्धवसेना, ८४ शरद पवार गट... अखेर महाविकास आघाडीचा फॉर्म्युला ठरला!
2
अजित पवार गटाच्या राष्ट्रवादीचे घड्याळ चिन्ह गाेठवले जाणार का? गुरुवारी हाेणार सुनावणी
3
शिंदेसेनेचे ४५ उमेदवार जाहीर; ९ मंत्र्यांना पुन्हा संधी; मुख्यमंत्री कोपरी पाचपाखाडीमधून लढणार
4
मनसेचे ४५ उमेदवार ठरले! मुंबईत १८ तर ठाण्यातून ७ उमेदवार; अमित ठाकरे माहीममधून रिंगणात
5
शेअर बाजार गडगडला! गुंतवणूकदारांचे ९.१९ लाख कोटी रूपये दिवसभरात स्वाहा!
6
खडकवासला मतदारसंघात मनसेचा मोठा धमाका; सोनेरी आमदाराच्या सुपुत्राला उमेदवारी
7
विधानसभा निवडणुकीसाठी राज्यात आता चौथ्या आघाडीची घोषणा; प्रकाश आंबेडकरांना ऑफर
8
 "याचं उत्तर त्यांना द्यावं लागेल"; सुप्रिया सुळेंनी काढला नवा मुद्दा, अजित पवारांची कोंडी?
9
अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे उमेश पाटील यांना पक्षात घेण्यास रोहित पवारांचा विरोध, कारण...
10
मविआत मोठा भाऊ काँग्रेसच...! ठाकरे-पवार पहिल्यांदाच १०० पेक्षा कमी जागा लढवणार?
11
Vidhan Sabha Election 2024: तिसऱ्या आघाडीचा साताऱ्यातील आठ मतदारसंघाबद्दल मोठा निर्णय
12
मुंबई अध्यक्षपदाचा राजीनामा द्या; बंडखोरीच्या तयारीत असलेल्या समीर भुजबळांना अजितदादा-तटकरेंचा आदेश!
13
लोकसभा निवडणुकीत मुख्यमंत्र्यांच्या विमानातून ४० कोटी आले; खैरेंच्या आरोपाने खळबळ
14
वक्फ सुधारणा विधेयकाच्या JPC बैठकीत राडा; खासदारानं काचेची बाटली फोडली, काय घडलं?
15
फॅन वाले बाबा की जय हो! शिखर धवन बनला 'पंखेवाले बाबा', गब्बर अन् 'लड्डू मुत्या' गाणं...
16
मविआत फूट? शेतकरी कामगार पक्षाने जाहीर केले ५ उमेदवार; जयंत पाटलांनी केली घोषणा
17
Maharashtra Vidhan Sabha 2024: अजित पवार 'या' मतदारसंघात 'शिरूर पॅटर्न' राबविणार का?
18
मुसळधार पावसाचा बंगळुरूमध्ये कहर, बांधकाम सुरू असलेली इमारत कोसळली, मजूर अडकल्याची भीती
19
शिंदे समर्थक अपक्ष आमदार शरद पवारांच्या राष्ट्रवादीत जाणार, भाजपाला दिला होता पराभवाचा धक्का
20
कॅमेरा ऑन केला अन् पळून गेली...; 'या' Video ला मिळाले ३० मिलियन व्ह्यूज, लोक झाले हैराण

महावितरणच्या भांडूप परिमंडळात वीजबिल वसुलीची धडक कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 18, 2022 4:54 PM

नोव्हेंबर महिन्यात वीज बिल न भरणाऱ्या ६,४७४ ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित 

नवी मुंबई : महावितरणच्या भांडूप परिमंडलातील पेण, ठाणे व वाशी मंडळात विविध वर्गवारीतील  उच्चदाब व लघुदाब ग्राहकांची एकूण थकबाकी ३११ कोटीची आहे. यामध्ये,चालू बिल जोडल्यास सदर थकबाकी ६७५ कोटीच्या घरात आहे. महावितरणवर थकबाकीचा डोंगर वाढत असल्यामुळे व वीज ग्राहक वीजबिल भरणावर दुर्लक्ष करीत असल्यामुळे, महावितरणची आर्थिक स्थिती बिगडत आहे. विविध माध्यमातून वारंवार विनंती करूनही अनेक ग्राहकांनी आपले वीज बिल भरले नाहीत. सध्या, कंपनीची आर्थिक स्तिथी अत्यंत वाईट असून नाईलाजाने महावितरणला ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित करावा लागत आहे. कोंकण प्रादेशिक कार्यालयाचे सह व्यवस्थापकीय संचालक चंद्रकांत डांगे यांच्या आदेशानुसार वसुलीची धडक मोहीम भांडूप परिमंडलाने  सुरु केली असून त्यांनी वीजबिल थकबाकीदारांचा वीजपुरवठा त्वरित खंडित करण्याचे आदेश सर्व क्षेत्रीय कार्यालयांना दिले आहेत . त्यानुसार, १ नोव्हेंबर पासून ते १५ नोव्हेंबर या कालावधीत ६,४७४ ग्राहकांचा वीजपुरवठा तात्पुरता खंडित करण्यात आला आहे. 

भांडूप परिमंडलात घरघुती  ग्राहकांची थकबाकी – ५१.८९ कोटी, वाणिज्यिक ग्राहकांची थकबाकी – २४.७२ कोटी,  औद्योगिक ग्राहकांची थकबाकी – ५१.५२ कोटी, कृषी ग्राहकांची- २.२१ कोटी, स्ट्रीटलाईटची थकबाकी- १६८.२० कोटी, पाणी पुरवठा योजनांची थकबाकी ५.५५ कोटीवर तर इतर ग्राहकांची थकबाकी – ८.४५ कोटी झाली आहे. कोंकण प्रादेशिक कार्यालयाचे सह व्यवस्थापकीय संचालक चंद्रकांत डांगे यांच्या आदेशानुसार, भांडुप परिमंडलचे मुख्य अभियंता शधनंजय औंढेकर  यांनी परिमंडलांतर्गत सर्व कार्यालयांना धडक कारवाई सुरु करण्याचे निर्देश दिले असून, आतापर्यंत ६४७४ ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे. यामध्ये ठाणे मंडळात १८१५ , वाशी मंडळात ३०८७ तर पेण मंडळात १५७२ ग्राहकांचा समावेश आहे.     

मुख्य अभियंता औंढेकर  म्हणाले की, “ महावितरण ग्राहकांना उत्तम सेवा देण्यासाठी नेहमी तत्पर असते.  आपल्या जीवाची परवा न करता महावितरणचे कर्मचारी ग्राहकांना अखंडित वीजपुरवठा करण्यासाठी झटत असतात. ग्राहकांना वारंवार विनंती करून ही थकबाकीदार ग्राहक वीज बिल भारत नाही. महावितरणची थकबाकी वाढत असल्यामुळे आर्थिक परिस्थिती बघता नाईलाजाने महावितरणला वीजपुरवठा खंडित करण्याची वेळ आली आहे.  वीज पुरवठा खंडित होऊ नये म्हणून  ग्राहकांनी वीजबिल भरून महावितरणाला सहकार्य करावे. सध्या महावितरणच्या कँश कलेक्शन सेंटर शनिवार व रविवार सुद्धा चालू ठेवण्यात आले आहेत. तरी,सर्व ग्राहकांनी याचा लाभ घ्यावा. याशिवाय, महावितरणच्या संकेत स्थळावर किंवा महावितरण मोबाईल अँप द्वारे ही वीजबिल भरता येते.

टॅग्स :mahavitaranमहावितरण