बेकायदा पार्किंगवर कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 18, 2018 12:30 AM2018-10-18T00:30:19+5:302018-10-18T00:30:35+5:30

नवी मुंबई : नेरु ळमधील सेक्टर-१, सेक्टर-६ येथे थाटण्यात आलेल्या गॅरेजेसमुळे दुरु स्तीसाठी येणारी वाहने रस्त्याच्या कडेला पार्किंग केली ...

Action on illegal parking in nerul | बेकायदा पार्किंगवर कारवाई

बेकायदा पार्किंगवर कारवाई

Next

नवी मुंबई : नेरु ळमधील सेक्टर-१, सेक्टर-६ येथे थाटण्यात आलेल्या गॅरेजेसमुळे दुरु स्तीसाठी येणारी वाहने रस्त्याच्या कडेला पार्किंग केली जात आहेत. वाहनाच्या बेकायदा पार्किंगमुळे वाहतूककोंडी आणि अपघात होत आहेत. या बाबतचे वृत्त ‘लोकमत’ने प्रसिद्ध केले होते. या वृत्ताची दखल घेत वाहतूक पोलीस आणि महापालिकेने संयुक्त कारवाई करून वाहतुकीसाठी रस्ते मोकळे केले आहेत.
नवी मुंबई शहरात वाढलेली लोकसंख्या, वाहनांची वर्दळ यामुळे रस्ते आणि वाहने पार्किंगच्या जागा अपुऱ्या पडू लागल्या आहेत, यामुळे वाहतूककोंडीची समस्या वाढली आहे. नेरु ळ पश्चिमेला राजीव गांधी उड्डाणपुलाजवळ सेक्टर-४ आणि-६ च्या मधील रस्त्याला अनेक रस्ते जोडलेले आहेत. राजीव गांधी उड्डाणपुलावरून पामबीच मार्गाकडे जाणाºया रस्त्यावर बेकायदेशीरपणे विविध वाहने दुरु स्तीची गॅरेजेस सुरू करण्यात आली आहेत. या गॅरेजेसमध्ये दुरु स्तीसाठी येणारी वाहने रस्त्याच्या कडेलाच उभी केली जातात. या रस्त्यावर नो पार्किंगचे फलक लावण्यात आलेले असतानाही मोठ्या प्रमाणावर वाहने उभी केली जात होती, तसेच या भागातील बस थांब्यांपुढे देखील बेकादेशीर पार्किंग होत असल्याने वाहतूककोंडीची समस्या निर्माण झाली होती. या वाहतूककोंडीमुळे नागरिकांना आणि विद्यार्थ्यांना रस्ता ओलांडणे देखील जिकरीचे झाले होते.
याबाबत ‘लोकमत’ने मंगळवार, १५ आॅक्टोबर रोजी बातमी प्रसिद्ध केली होती. बातमीची दखल घेत सीवूड वाहतूक पोलीस आणि पालिकेचे नेरु ळ विभाग कार्यालय यांच्यामार्फत संयुक्त कारवाई करण्यात आली. कारवाईमध्ये वाहनांना दंड आकारण्यात आला असून, काही वाहने विभाग कार्यालयात जमा करण्यात आली आहेत. तसेच गॅरेजमधील साहित्यदेखील जप्त केले आहे. या कारवाईमुळे वाहतुकीसाठी रस्ते मोकळे झाले असून, नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.

Web Title: Action on illegal parking in nerul

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.