लेटलतिफ कर्मचाऱ्यांवर कारवाई, १०२ कर्मचाºयांना दिली कारणेदाखवा नोटीस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 29, 2018 05:13 AM2018-09-29T05:13:21+5:302018-09-29T05:13:55+5:30
महानगरपालिका मुख्यालयामध्ये उशिरा येणा-या कर्मचा-यांवर आयुक्तांनी कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. शुक्रवारी तब्बल १०२ अधिकारी, कर्मचारी उशिरा आल्याचे निदर्शनास आले असून, सर्वांना कारणे दाखवा नोटीस देण्यात आली आहे.
नवी मुंबई - महानगरपालिका मुख्यालयामध्ये उशिरा येणाºया कर्मचाºयांवर आयुक्तांनी कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. शुक्रवारी तब्बल १०२ अधिकारी, कर्मचारी उशिरा आल्याचे निदर्शनास आले असून, सर्वांना कारणे दाखवा नोटीस देण्यात आली आहे. विभागनिहाय उशिरा येणाºयांचा अहवालही तयार करण्यात आला आहे.
नवी मुंबई महापालिका आयुक्त रामास्वामी एन. यांनी पदभार स्वीकारल्यानंतर कर्मचाºयांनी शिस्तीचे पालन करावे, वेळेवर कामावर हजर राहावे, याविषयी सूचना दिल्या होत्या. कामामध्ये हलगर्जी करणाºयांवर कारवाई करण्याचा इशाराही दिला होता. महापालिकेमधील कंत्राटी कामगार, अग्निशमन जवान यांच्या वेतनवाढीसह पदोन्नतीचे प्रश्नही सोडविले आहेत. अधिकारी, कर्मचाºयांचे प्रश्न सोडविल्यानंतर सर्वांनी वेळेत काम करणे अपेक्षित असताना अनेक जण वेळेत कामावर येत नसल्याचे लक्षात आले. शुक्रवारी आयुक्तांनी स्वत: प्रवेशद्वारावर थांबून उशिरा येणाºयांना लॉबीमध्येच थांबण्याच्या सूचना केल्या. तब्बल १०२ कर्मचारी उशिरा आल्याचे निदर्शनास आले. आयुक्तांनी अचानक केलेल्या कारवाईमुळे महापालिकेमध्ये खळबळ उडाली. कर्मचाºयांच्या रांगा लागल्याचे चित्र पाहावयास मिळाले होते. उशिरा येणाºया सर्वांवर कारवाई करण्याच्या सूचना प्रशासन उपआयुक्त किरणराज यादव यांना दिल्या. यादव यांनी सर्वांना कारणे दाखवा नोटीस दिल्या आहेत.
महापालिका आयुक्तांनी उशिरा येणाºया कर्मचाºयांचा अहवाल तयार केला आहे. कोण उशिरा येऊन लवकर निघून जातात, कोणते कर्मचारी उशिरापर्यंत काम करत असतात, या सर्वांचा तपशील संकलित केला आहे. अनेक दिवसांपासून याविषयी कार्यवाही सुरू होती. हा अहवाल संबंधित विभाग प्रमुखांना देण्यात आला आहे. यापुढे कोणीही उशिरा आल्यास किंवा कामामध्ये कुचराई केल्यास संबंधितांवर कडक कारवाई करण्याचा इशाराही देण्यात आला आहे.
महापालिका मुख्यालयात वेळेत येणाºया अधिकारी व कर्मचाºयांची पाहणी करण्यात आली. जे कर्मचारी उशिरा आले त्यांना कारणे दाखवा नोटीस देण्यात आली आहे. कर्मचाºयांचा अहवालही तयार करण्यात आला असून, तो प्रत्येक विभागप्रमुखांना देण्यात येणार आहे. कामकाजामध्ये शिस्त यावी यासाठी ही कार्यवाही करण्यात आली आहे.
- रामास्वामी एन.
आयुक्त,
नवी मुंबई महापालिका