द्रुतगती महामार्गावरील निशीसागर हॉटेलवर कारवाई

By admin | Published: May 6, 2017 06:06 AM2017-05-06T06:06:10+5:302017-05-06T06:06:10+5:30

मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर प्रवाशांच्या सेवेसाठी शासन हॉटेलला परवानगी देते. मात्र, याच हॉटेलमध्ये जास्त दराने वस्तूंची

Action on the Nishisagar Hotel on Express Highway | द्रुतगती महामार्गावरील निशीसागर हॉटेलवर कारवाई

द्रुतगती महामार्गावरील निशीसागर हॉटेलवर कारवाई

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
वावोशी : मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर प्रवाशांच्या सेवेसाठी शासन हॉटेलला परवानगी देते. मात्र, याच हॉटेलमध्ये जास्त दराने वस्तूंची विक्र ी होत असल्याचा प्रकार निदर्शनास आला आहे. मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील खोपोलीनजीक असलेल्या निशीसागर हॉटेलवर राज्य शासनाच्या अन्न, औषध प्रशासन व वजनकाटे निरीक्षकांनी गुरुवारी अचानक धाड टाकली.
या वेळी हॉटेल व्यवस्थापनाने हॉटेल परवान्याबाबत अन्न औषध प्रशासन कार्यालयाच्या अटी-शर्तीचा भंग केल्याचे निदर्शनास आणल्यानंतर अधिकाऱ्यांनी तत्काळ हॉटेल बंद करण्याचे आदेश दिले.या हॉटेलमध्ये खाद्यविक्री छापील किमतीपेक्षा जास्त रक्कम घेऊन प्रवाशांची लूट करीत असल्याचा प्रकार सुरू होता.
२ मे रोजी मंत्रालयातील एका अधिकाऱ्याने हा प्रकार उघडकीस आणल्याची माहिती मिळत आहे. मुंबईहून पुण्याला जाताना ते या हॉटेलमध्ये थांबले असता, पिण्याच्या पाण्याच्या बाटलीवरील छापील किमतीपेक्षा जास्त रक्कम घेण्यात आल्याने त्या अधिकाऱ्याने जाब विचारला असता, प्रथम त्यांना उडवाउडवीची उत्तरे देण्यात आली, तेव्हा त्यांनी संबंधित विभागाच्या निरीक्षकांना दूरध्वनीवरून प्रकार सांगितल्यानंतर कर्जत येथील निरीक्षक जाधव यांनी तत्काळ हॉटेलवर येऊन तक्रारीबाबत दखल घेतली.
या हॉटेलच्या प्रांगणातच पेट्रोलपंप आहे. त्यांच्या १८ महाकाय टाक्यांमध्ये पेट्रोल भरलेले असते. या हॉटेल परिसरातील जागेबाबत तपासणी न करताच एसटी महामंडळ प्रशासनाने एसटी थांबा दिल्याने प्रवासी आश्चर्य व्यक्त करीत आहेत जर एखादी घटना घडल्यास गर्दी असलेल्या या जागेत मोठ्या प्रमाणात जीवितहानी होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

निशीसागर हॉटेलने
अन्न औषध प्रशासन कार्यालयाच्या अटी शर्तीचा भंग केल्याने प्रशासनाने एक दिवस बंदची कारवाई केली.
- प्रशांत पवार, निरीक्षक, अन्न औषध प्रशासन

निशीसागर हॉटेलमध्ये छापील किमतीपेक्षा जास्त दरात विक्र ी होत असल्याच्या तक्र ारी प्राप्त झाल्यानंतर हॉटेलवर कारवाई केली आहे व अहवाल कोकण भवनला पाठविला आहे. त्यामुळे पुढील दंडात्मक कारवाई कोकण भवनमधून होणार आहे.
- युवराज जाधव,
वजन काटे निरीक्षक, कर्जत

Web Title: Action on the Nishisagar Hotel on Express Highway

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.