ऑनलाईन सेक्स रॅकेटचा भांडाफोड गुन्हे शाखेची कारवाई
By सूर्यकांत वाघमारे | Published: November 10, 2023 07:36 PM2023-11-10T19:36:15+5:302023-11-10T19:36:36+5:30
टीव्ही कलाकार तरुणींचा वापर
नवी मुंबई : टिंडर ऍपद्वारे चालणाऱ्या सेक्स रॅकेटचा पोलिसांनी भांडाफोड केला आहे. टीव्ही कलाकार तरुणीचा वेश्यागमनासाठी वापर करून हे रॅकेट चालवले जात होते. अल्पवयीन मुलीकडून हे रॅकेट चालवले जात होते.
टिंडर ऍपद्वारे सेक्स रॅकेट चालत असल्याची माहिती गुन्हे शखेच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाला मिळाली होती. त्याद्वारे वरिष्ठ निरीक्षक अतुल आहेर यांचे पथक एक महिन्यांपासून बनावट ग्राहकांद्वारे सेक्स रॅकेटचा माहिती काढत होते. अखेर रॅकेट चालवणाऱ्या मुलीसोबत संपर्क झाला असता तिने ५० हजार रुपयांमध्ये टीव्ही कलाकार तरुणी पुरवते असे सांगितले. तर तडजोड करून ३० हजार रुपयांवर तिने बनावट ग्राहकासोबत व्यवहार ठरवलं होता.
त्यानुसार एपीएमसी मधील सतरा प्लाझा येथे मॉडल तरुणींना घेऊन ती त्याठिकाणी आली असता गुन्हे शाखेच्या पथकाने मंगळवारी रात्री सापळा रचून त्यांच्यावर कारवाई केली. यावेळी सेक्स रॅकेट चालवणारी मुलगी अल्पवयीन असून मालाडची राहणारी असल्याचे समजले. तर तिने ग्राहकांना पुरवण्यासाठी आणलेल्या चार मुलींची सुटका करून त्यांचीही सुधारगृहात रवानगी करण्यात आली आहे. याप्रकरणी एपीएमसी पोलिस ठाण्यात संबंधितांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.