शहाबाज टेकडीवरील १४५ झोपड्यांवर कारवाई
By नारायण जाधव | Published: May 24, 2024 06:27 PM2024-05-24T18:27:21+5:302024-05-24T18:28:07+5:30
महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या निर्देशानुसार व उपायुक्त (अतिक्रमण) डॉ.राहुल गेठे यांच्या मार्गदर्शनानुसार अे विभाग बेलापूर कार्यालयाचे विभाग अधिकारी शशिकांत तांडेल यांच्या नेतृत्वात या झोपड्यात निष्कासित केल्या.
नवी मुंबई : पावसाळ्यातील संभाव्य दुर्घटना टाळण्यासाठी नवी मुंबई महापालिकेने आता कडीकपार आणि डोंगरांच्या तळाशी असलेल्या झोपड्यांविराधोत धडक कारवाई सुरू केली आहे. याचाच एक भाग म्हणून अे विभाग बेलापूर कार्यालयाअंतर्गत पंचशिलनगर,शाहबाज टेकडीवर उभारलेल्या १४५ अनधिकृत झोपड्यांवर शनिवारी धडक कारवाई केली.
महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या निर्देशानुसार व उपायुक्त (अतिक्रमण) डॉ.राहुल गेठे यांच्या मार्गदर्शनानुसार अे विभाग बेलापूर कार्यालयाचे विभाग अधिकारी शशिकांत तांडेल यांच्या नेतृत्वात या झोपड्यात निष्कासित केल्या. या मोहिमेत मयुरेश पवार (कनिष्ठ् अभियंता), स्वप्निल तारमळे (वरिष्ठ् लिपिक), नयन भोईर (लिपिक) यांनी सहभाग घेतला. झोपड्या तोडण्याकरिता १५ मजूर, १ गॅसकटर, १ जेसीबी आणि १ पिकअपचा वापर करण्यात आला. अनुचित प्रकार टाळण्यासाठी अतिक्रमण विभागाकडील पोलिस तैनात होते.