नवी मुंबई: मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती च्या परिसरातील हाॅटेलसह सर्व व्यावसायिक बांधकामावर महानगर पालिकेने हातोडा चालविला. मार्जिनल स्पेसमधील सर्व बांधकामे हटविण्यात आली. जेसीबीच्या सहाय्याने दिवसभर कारवाई सुरू होती.
नवी मुंबई महानगर पालिकेच्या अतिक्रमण उपायुक्त राहूल गेठे यांनी अनधिकृत बांधकाम विरोधात मोहीम सुरू केली आहे. तुर्भे विभाग अधिकारी भरत धांडे व पथकाने बुधवारी वाशी सेक्टर 19 मधील हाॅटेल, लाॅज, वाहतूकदार व इतर बांधकामावर कारवाई सुरू केली. दुकानासमोरील शेड, वाढीव बांधकाम जेसीबी व मजुरांच्या सहाय्याने काढण्यात आली. व्यावसायिक अतिक्रमणावरील ही या परिसरातील सर्वात मोठी कारवाई होती. अतिक्रमण करणारांकडून मोठ्याप्रमाणात दंडही वसूल करण्यात आला. कारवाई दरम्यान प्रचंड गर्दी झाल्याने या परिसरात वाहतूक कोंडी झाली होती.