रेती उत्खनन करणाऱ्या बोटीवर कारवाई; वाघिवली येथील खाडीतील घटना, गुन्हा दाखल

By सूर्यकांत वाघमारे | Published: September 7, 2022 07:24 PM2022-09-07T19:24:11+5:302022-09-07T19:24:25+5:30

बोटीतील व्यक्तिंनी पळ काढल्याने कोणीही हाती लागलेले नाही.

Action on sand mining boat; The incident in the creek at Waghivali, a case has been registered | रेती उत्खनन करणाऱ्या बोटीवर कारवाई; वाघिवली येथील खाडीतील घटना, गुन्हा दाखल

रेती उत्खनन करणाऱ्या बोटीवर कारवाई; वाघिवली येथील खाडीतील घटना, गुन्हा दाखल

googlenewsNext

नवी मुंबई : अवैधरित्या रेती उत्खनन करणाऱ्या बोटीवर तहसीलदार विभागाच्या पथकाने कारवाई केली आहे. याप्रकरणी संबंधितांवर एनआरआय पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र कारवाईवेळी बोटीतील व्यक्तिंनी पळ काढल्याने कोणीही हाती लागलेले नाही. 

वाघिवली खाडी परिसरात रेती उत्खनन सुरु असल्याची माहिती तहसीलदार विभागाला मिळाली होती. त्याद्वारे मंडळ अधिकारी व तलाठी त्यांचे पथक रविवारी दुपारच्या सुमारास बोटीतून पाहणी करत होते. त्यावेळी एका बोटीतून सक्शन पंपाद्वारे रेती उत्खनन सुरु असल्याचे दिसून आले. परंतु पथकाची बोट त्यांच्याकडे जात असतानाच बोटीला पाण्यात उड्या मारून पळ काढला. तर हाती लागलेली बोट तहसीलदार विभागाने नष्ट केली आहे. याप्रकरणी बुधवारी एनआरआय पोलिसांकडे तक्रार करण्यात आली आहे. त्याद्वारे उत्खनन करणाऱ्या अज्ञात व्यक्तिंविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. 

Web Title: Action on sand mining boat; The incident in the creek at Waghivali, a case has been registered

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.