कोपरखैरणेसह घणसोलीमध्ये अतिक्रमणावर कारवाई; बिल्डरच्या कार्यालयावर हातोडा

By नामदेव मोरे | Published: January 10, 2024 05:59 PM2024-01-10T17:59:34+5:302024-01-10T18:00:06+5:30

हातगाड्यांसह पानटपरीवरही कारवाई

Action on trespassing in the thick of the elbows; Hammer at the builder's office | कोपरखैरणेसह घणसोलीमध्ये अतिक्रमणावर कारवाई; बिल्डरच्या कार्यालयावर हातोडा

कोपरखैरणेसह घणसोलीमध्ये अतिक्रमणावर कारवाई; बिल्डरच्या कार्यालयावर हातोडा

नवी मुंबई : अनधिकृत बांधकामांविरोधात महानगरपालिकेने मोहीम सुरू केली आहे. कोपरखैरणेमध्ये दोन बिल्डरच्या कार्यालयातील अतिक्रमण हटविले. ठाणे बेलापूर रोडवरील हातगाड्या, पानटपऱ्यांसह इतर अतिक्रमण हटविण्यात आले.

नवी मुंबई महानगरपालिका आयुक्त राजेश नार्वेकर व अतिक्रमण विभागाचे उपायुक्त राहूल गेठे यांच्या मार्गदर्शनाखाली अनधिकृत बांधकामांच्या विरोधात मोहीम राबविण्यात येत आहे. कोपरखैरणे सेक्टर ५ मधील वैदेश्वर डेव्हलपर्स (वैष्णवी इंटरप्रायजेस) व वेदेश्वर डेव्हलपर्स (मोनालीसा पॅलेस) यांनी त्यांच्या कार्यालयामध्ये अनधिकृतपणे पोटमाळ्याचे बांधकाम केले होते. त्यांना विभाग कार्यालयाच्या माध्यमातून नोटीस दिली होती. परंतु त्यांनी स्वत:हून अतिक्रमण न हटविल्यामुळे प्रशासनाने मोहीम राबवून अतिक्रमण हटविले.

ठाणे बेलापूर रोडवर अवैधरित्या हातगाड्या, पानटपरीसह इतर फेरीवाल्यांनी अतिक्रमण केले होते. महानगरपालिकेच्या पथकाने दिवसभरात ४ हातगाड्या, १ पानटपरी, १ ऊसाचा गाडा, १ पीकअप व्हॅन हटविण्यात आले आहे. संपूर्ण महानगरपालिका क्षेत्रामध्ये अतीक्रमण विरोधी कारवाई सुरूच ठेवली जाणार आहे.

Web Title: Action on trespassing in the thick of the elbows; Hammer at the builder's office

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.