शहरं
Join us  
Trending Stories
1
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एकाच वाक्यात सांगितलं
3
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
4
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
5
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
6
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
7
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
8
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
9
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं
10
Pushpa 2 Trailer: "पुष्पा नाम नही ब्रँड है", अल्लू अर्जुनचा रुद्रावतार आणि धमाकेदार ॲक्शन, 'पुष्पा २'चा ट्रेलर प्रदर्शित
11
"ऑस्ट्रेलियातच थांबा, तुमची गरज लागू शकते"; दोन IPL स्टार्स ना BCCIचा महत्त्वाचा निरोप
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : प्रतिभा पवारांना बारामतीमधील टेक्सटाईल पार्कमध्ये अडवले; राजकीय चर्चांना उधाण
13
“भाजपा राजवटीत फक्त उद्योगपतीच सेफ, काँग्रेसने सर्व राज्यांचा विकास केला”: प्रियंका गांधी
14
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "मी शरद पवारांना सोडलं नाही, सगळ्या आमदारांना..." अजित पवारांचं बारामतीत मोठं विधान
15
'सत्य बाहेर येत आहे...', PM नरेंद्र मोदींनी केले 'द साबरमती रिपोर्ट' चित्रपटाचे कौतुक
16
भारताला दिलासा! शुबमन गिलच्या अंगठ्याला दुखापत, त्याच्या जागी संघात येणार अनुभवी खेळाडू
17
साप्ताहिक राशीभविष्य: ५ राशींना उत्तम, धनलाभ-पदोन्नती योग; सुख-समृद्धी, शुभ लाभदायी काळ!
18
इंग्रजांप्रमाणेच जातीजातीत भांडणे लावण्याचे कॉंग्रेसचे धोरण; योगी आदित्यनाथ यांचा हल्लाबोल
19
Baba Siddiqui : बाबा सिद्दिकी हत्या प्रकरणात पोलिसांना मोठं यश; आरोपींना आर्थिक मदत करणारा सापडला अन्...
20
काँग्रेस म्हणजे लबाडाचं आवताण, शेतकऱ्यांना खोटं सांगतंय; देवेंद्र फडणवीसांची टीका

ठाण्यातील ३५ तलावांच्या संवर्धनासाठी अ‍ॅक्शन प्लॅन

By admin | Published: November 28, 2015 1:15 AM

कचराळी तलावाच्या झालेल्या दुरवस्थेबाबत लोकमतमध्ये वृत्त प्रसिद्ध होताच त्याची दखल घेऊन आयुक्त संजीव जयस्वाल यांनी शुक्रवारी सकाळी त्याची पाहणी केली.

ठाणे : कचराळी तलावाच्या झालेल्या दुरवस्थेबाबत लोकमतमध्ये वृत्त प्रसिद्ध होताच त्याची दखल घेऊन आयुक्त संजीव जयस्वाल यांनी शुक्रवारी सकाळी त्याची पाहणी केली. या वेळी तलावाच्या दुरवस्थेबाबत दुजोरा देऊन पुढील १५ दिवसांत त्याचा कायापालट झालेला असेल, अशी हमीही त्यांनी दिली. तसेच याकडे आपण जातीने लक्ष देणार असून रोज सायंकाळी त्याची पाहणी करणार असल्याचे सांगितले. विशेष म्हणजे, शहरात शिल्लक असलेल्या ३५ तलावांची निगा, देखभालीचा कृती आराखडा तयार करून एक अ‍ॅक्शन प्लॅन तयार केला जाणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. येथील उद्यानातील तुटलेली खेळणी, उखडलेले पेव्हरब्लॉक, कचरा, तलावातील दुर्गंधी, बंदावस्थेत असलेली पाणपोई, शौचालय आदींची त्यांनी पालिकेच्या संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांसमवेत पाहणी केली. त्यानंतर, या तलावाची निगा, देखभाल न करणाऱ्या ठेकेदाराला काळ्या यादीत टाकण्याचा इशाराही दिला. तसेच सध्या नवीन शौचालये तयार होण्यापूर्वी येथे तात्पुरत्या स्वरूपात बायोटॉयलेटची व्यवस्था करण्याचे आदेशही त्यांनी संबंधित विभागाला दिले.या तलावाच्या ठिकाणी सुशोभीकरण करण्यासाठी १ कोटी ९७ लाखांच्या प्रस्तावाला एक वर्षापूर्वीच मान्यता मिळाली होती. मात्र, त्या कामाला मुहूर्त सापडला नव्हता.पालिकेच्या म्हणण्यानुसार यात काही तांत्रिक अडचणी होत्या. परंतु, आता त्या दूर झाल्या असून येत्या सोमवारी या कामाच्या शुभारंभाचा नारळ फुटणार आहे. त्यानुसार, येथे सिंथेटीक पद्धतीचे जॉगिंग ट्रॅक, येणाऱ्या पर्यटकांसाठी बसण्यासाठी तंबू, गजिबो फाउंटन, पाणपोईची दुरुस्ती, रंगरंगोटी, तुटलेले कठडे दुुरुस्त करणे, शौचालय, अत्याधुनिक जीम आदींची कामे केली जाणार आहेत.