प्लास्टिक बाळगणाऱ्यांवर कारवाई
By ऑनलाइन लोकमत | Published: October 24, 2019 01:38 AM2019-10-24T01:38:39+5:302019-10-24T06:10:22+5:30
प्लास्टिक पिशव्या बाळगणारे दुकानदार, व्यापाऱ्यांवर पनवेल महापालिकेच्या मार्फत गुरुवारी कारवाई करण्यात आली.
पनवेल : प्लास्टिक पिशव्या बाळगणारे दुकानदार, व्यापाऱ्यांवर पनवेल महापालिकेच्या मार्फत गुरुवारी कारवाई करण्यात आली. कारवाईत सुमारे साडेआठ लाखांचा दंड वसूल करण्यात आला.
पनवेल महानगरपालिकेच्या चारही प्रभाग अधिकारी यांच्यामार्फत विविध ठिकाणी केलेल्या कारवाईत १७०० किलो प्लास्टिक जप्त करण्यात आले आहे. १७३ व्यापाºयांवर ही कारवाई करण्यात आली असून, कारवाईत आठ लाख ६८ हजार दंड वसूल करण्यात आला.
शहरातील प्रभाग क्रमांक १९ मध्ये लाइनआळी परिसरात करण्यात आलेल्या कारवाईच्या वेळी काही दुकानदारांनी विरोध करीत आपली दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय घेतला. मात्र, प्लास्टिकवर बंदी असल्याने कारवाईत कोणतीही मुभा देणार नसल्याचे प्रभाग अधिकारी श्रीराम हजारे यांनी स्पष्ट केले.
प्लास्टिकवर बंदी घातलेली पनवेल महापालिका ही राज्यातील पहिली महानगरपालिका आहे. मात्र, अद्याप पालिका क्षेत्रात प्लास्टिक विक्री सुरूच आहे.