कोकणातील सात सरपंचांसह एक उपसरपंच अपात्र घोषित, कोकण आयुक्त विलास पाटील यांची कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Published: June 23, 2022 12:34 PM2022-06-23T12:34:37+5:302022-06-23T12:36:46+5:30

Sarpanch: कोकण विभागातील ७ सरपंच, १ उपसरपंच आणि एका सदस्यावर महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियमानुसार अपात्रतेची कारवाई केली आहे. गैरव्यवहार प्रकरणातील तक्रारीत दोषी आढळल्याने त्यांना त्यांच्या पदावरून काढून टाकले आहे.

Action taken by Konkan Commissioner Vilas Patil on 7 Sarpanch | कोकणातील सात सरपंचांसह एक उपसरपंच अपात्र घोषित, कोकण आयुक्त विलास पाटील यांची कारवाई

कोकणातील सात सरपंचांसह एक उपसरपंच अपात्र घोषित, कोकण आयुक्त विलास पाटील यांची कारवाई

googlenewsNext

नवी मुंबई :  कोकण विभागातील ७ सरपंच, १ उपसरपंच आणि एका सदस्यावर महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियमानुसार अपात्रतेची कारवाई केली आहे. गैरव्यवहार प्रकरणातील तक्रारीत दोषी आढळल्याने त्यांना त्यांच्या पदावरून काढून टाकले आहे. कोकण विभागीय आयुक्त विलास पाटील यांनी ही कारवाई केली असून मागील काही दिवसांतील अशाप्रकारची ही दुसरी कारवाई आहे.

कोकण विभागांतर्गत येणाऱ्या जिल्ह्यांमधील ग्रामपंचायतींमध्ये सरपंच, उपसरपंच, सदस्यांमार्फत होणारे गैरवर्तन, गैरव्यवहारांबाबत मुख्य कार्यकारी अधिकारी आणि जिल्हा परिषदेने अहवाल सादर केला होता. यात ठाणे, रायगड, रत्नागिरी, पालघर आणि सिंधुदूर्ग या पाच जिल्ह्यांतील एकूण ३५ सरपंच, उपसरपंच आणि सदस्यांविरोधातील तक्रारींचा समावेश होता. त्यानुसार पाटील यांनी १५  फेब्रुवारी २०२० रोजी सुनावणी घेतल्या होत्या. यापैकी १६ प्रकरणांवर निर्णय घेतला आहे. तर उर्वरित १० प्रकरणांचा फेरअहवाल सादर करण्याचे निर्देश दिले होते. हा फेरअहवाल सादर आल्यानंतर अपात्रतेची कारवाई केली आहे.

गटविकास अधिकाऱ्यांना निर्देश
ग्रामपंचायतींमध्ये अशा प्रकारचा गैरव्यवहार होणे गंभीर बाब आहे. भविष्यात असे प्रकार होऊ नयेत यादृष्टीने संबंधित विभागाने ठोस नियोजन करण्याची गरज असून त्यानुसार गटविकास अधिकारी आणि विस्तार अधिकाऱ्यांनी कार्यवाही करावी, अशा सूचना विलास पाटील यांनी केल्या आहेत.

 हे सरपंच झाले अपात्र 
सिंधुदूर्ग जिल्हयातील ग्रा.पं. पेंडूर- वेंगुर्ला, रायगड जिल्ह्यातील ग्रा.पं. रासळ-सुधागड पाली, ग्रा.पं. वावंढळ खालापूर, ग्रा.पं. तळवली तर्फे अष्टमी-रोहा येथील सरपंच यांना त्यांच्या सरपंच तसेच सदस्य पदावरूनही दूर केले आहे. सिंधुदूर्ग जिल्ह्यातील ग्रा.पं. उसप- दोडामार्ग, ग्रा.पं. कळसुली-कणकवली व ठाणे जिल्ह्यातील ग्रा.पं.नांदप-कल्याण येथील सरपंचांना त्यांचे सरपंच पदावरून दूर केले आहे. परंतु,  त्यांचे सदस्यत्व पद कायम ठेवले आहे. सिंधुदूर्ग जिल्ह्यातील ग्रा.पं. कडावल- कुडाळ ग्रामपंचायतीचे उपसरपंचाला त्यांच्या पदावरून दूर करून त्यांचे सदस्य पद कायम ठेवलेले आहे. तसेच ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथ येथील रहाटोली ग्रामपंचायतीच्या एका सदस्याला पदावरून काढून टाकले आहे. त्याचप्रमाणे रायगड जिल्ह्यातील मुरुड येथील वेळास्ते गावच्या सरपंचाच्या विरुद्ध दाखल केलेला अर्ज फेटाळला आहे.

Web Title: Action taken by Konkan Commissioner Vilas Patil on 7 Sarpanch

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.