कळंबोली : सिडकोने धडक मोहीम हाती घेत मंगळवारी कळंबोली वसाहतीमधील १५० झोपड्यांवर कारवाई केली. त्याचबरोबर काही अनधिकृत गॅरेजवरही हातोडा मारण्यात आला. गरजेपोटी बांधण्यात आलेल्या घरांना सिडकोने मात्र हात लावला नाही. या वेळी मोठ्या प्रमाणात स्थानिक प्रकल्पग्रस्त जमा झाले होते. कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून सिडकोच्या अतिक्र मण विरोधी पथकाने ही कारवाई टाळली.
सिडकोने नवीन वर्षात अतिक्र मणे अनधिकृत बांधकाम विरोधी मोठी मोहीम हाती घेतली आहे. यासंदर्भात त्यांच्याकडून कार्यक्र म तयार करण्यात आला आहे. नियोजन केलेल्या वेळापत्रकानुसार मंगळवारी सिडकोचे अनधिकृत बांधकाम विरोधी पथक कामगार, कर्मचारी तसेच दोन जेसीबी, एक ट्रक यांच्यासह कळंबोलीत धडकले. त्यांनी कळंबोली सेक्टर १ ई येथील नऊ गॅरेज तोडले आणि त्याचबरोबर सिडको कार्यालयाजवळील अल्प उत्पादन गटातील घरांसाठी राखीव असलेल्या मोकळ्या भूखंडावर अतिक्र मण करण्यात आलेल्या १०० झोपड्यांवर कारवाई केली. त्याचबरोबर मार्बल मार्केट परिसरातील ५० झोपड्यांवर हातोडा मारण्यात आला. प्रकल्पग्रस्तांच्या गरजेपोटी बांधलेली घरांवर ही कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला होता, त्यामुळे मंगळवारी सकाळी मोठ्या प्रमाणात सिडको प्रकल्पग्रस्त कळंबोली येथे जमले. सिडकोने गावठाण विस्तार न केल्याने आम्ही गरजेपोटी घरे बांधली आहेत. त्याच्यावर सिडको नियमानुसार कारवाई करू शकत नाही. हा मुद्दा घेऊन स्थानिक प्रकल्पग्रस्त कृष्णा भगत यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. यावर लवकरच सुनावणी होणे अपेक्षित आहे. हे प्रकरण न्यायालयात गेले असल्याने येथील बांधकामावर कारवाई होऊ नये, अशी मागणी सिडकोच्या व्यवस्थापकीय संचालकांकडे करण्यात आली होती. त्यानुसार मंगळवारी गरजेपोटी बांधण्यात आलेल्या घरांवर कारवाई करण्यात आली नाही.
या वेळी सहायक बांधकाम नियंत्रक विशाल ढगे, अमोल देशमुख, भूमापक बी. नामवाड यांच्या नेतृत्वाखाली ही मोहीम राबवण्यात आली. यापुढेही अशाच प्रकारे कारवाई करून अतिक्र मणाला पायबंद घालण्यात येणार असल्याचे सिडकोच्या अनधिकृत बांधकाम विरोधी विभागाकडून सांगण्यात आले. प्रकल्पग्रस्तांच्या गरजेपोटी बांधलेली घरांवर ही कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला होता, त्यामुळे मंगळवारी सकाळी मोठ्या प्रमाणात सिडको प्रकल्पग्रस्त कळंबोली येथे जमले. सिडकोने गावठाण विस्तार न केल्याने आम्ही गरजेपोटी घरे बांधली आहेत.