कोपरखैरणेमध्ये अनधिकृत बांधकामांवर कारवाई; एक इमारत पाडली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 18, 2019 11:10 PM2019-06-18T23:10:10+5:302019-06-18T23:10:19+5:30
अतिक्रमणविरोधी पालिका कारवाई सुरूच ठेवणार
नवी मुंबई : अनधिकृत बांधकामांविरोधात पालिकेने मोहीम तीव्र केली आहे. कोपरखैरणेमध्ये एक इमारत मंगळवारी पाडण्यात आली आहे. यापुढेही शहरात कारवाई सुरूच ठेवली जाणार आहे.
कोपरखैरणे विभागातील खैरणेगाव येथील घर क्र . ४१ खैरणे येथील हनिफ इनाफ फक्की यांनी नवी मुंबई महानगरपालिकेची कोणतीही पूर्वपरवानगी न घेता अनधिकृत बांधकाम चालू केले होते. या बांधकामास कोपरखैरणे विभागामार्फत महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगररचना अधिनियम १९६६ मधील कलम ५४ अन्वये नोटीस बजावण्यात आलेली होती. हनिफ फक्की यांनी केलेले अनधिकृत बांधकाम स्वत:हून हटविणे आवश्यक होते; परंतु त्यांनी सदर ठिकाणी अनधिकृत बांधकाम सुरू ठेवले होते. त्यामुळे या सर्व अनधिकृत बांधकामावर बांधकाम निष्कासनाची तोडक कारवाई करण्यात आली. कोपरखैरणे विभागाचे सहायक आयुक्त तथा विभाग अधिकारी अशोक मढवी यांनी विभागातील सहकारी अधिकारी, कर्मचारी यांच्या सहयोगाने ही धडक कारवाई केली.