शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'दगडा पेक्षा वीट बरी' प्रमाणे महाविकास आघाडी पेक्षा महायुती बरी; लक्ष्मण हाकेंनी स्पष्टच सांगितलं
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : बारामतीमध्ये शरद पवारांच्या बॅगांची तपासणी; अधिकाऱ्यांनी हेलिकॉप्टरमधील साहित्याची केली तपासणी
3
अजित पवार प्रचंड जातीवादी माणूस, त्यांनी कायम...; जितेंद्र आव्हाडांचा गंभीर आरोप
4
मुंबईवरून आलेल्या ट्रॅव्हल्समध्ये सापडली कोट्यवधीची रक्कम, मोजदाद सुरू; पोलिसांनी ठेवला पहारा
5
"मणिपुर ना एक है, ना सेफ है", हिंसाचारावरून मल्लिकार्जुन खरगेंचा PM नरेंद्र मोदींवर निशाणा
6
Amit Shah : चार नियोजित सभा सोडून अमित शाह तातडीने दिल्लीकडे रवाना; नेमकं कारण काय?
7
"मला जेलमध्ये टाकण्याची भाषा करू नका"; एकनाथ शिंदेंनी थोपटले दंड
8
Chalisgaon Vidhan Sabha: जुन्या पक्क्या मित्रांमध्ये रंगली आहे कट्टर लढत!
9
निष्काळजीपणा की कट? रुग्णालयातील NICU वॉर्डमध्ये कशी लागली आग; समोर आला रिपोर्ट
10
देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेले हे निर्णय विधानसभा निवडणुकीत ठरू शकतात गेमचेंजर
11
Indian Players Injured, IND vs AUS 1st Test: टीम इंडिया संकट में है! पहिल्या कसोटीआधी भारतीय संघातील ४ स्टार खेळाडू दुखापतग्रस्त
12
नाशिकमध्ये राज ठाकरेंचा विरोधकांवर घाव, तर अजित पवारांनी ताईंचा वाढवला भाव
13
Bachchu Kadu : "लोकसभेच्या निकालाची पुनरावृत्ती करा"; बच्चू कडू यांचं आवाहन
14
"आता मी थोड्याच दिवसांचा पाहुणा’’, मनोज जरांगे पाटील भावूक; समर्थकांना केलं असं आवाहन
15
शादी मुबारक! पापाराझींच्या कमेंटवर तमन्ना भाटियाची अशी रिॲक्शन; विजय वर्माला हसू आवरेना
16
Ashish Shelar : "स्टेज खचला! संकेत कळला?, भाषण संपताच खचते पायाखालची माती"; शेलारांचा ठाकरेंना टोला
17
"लष्कर-ए-तैयबाचा सीईओ बोलतोय...", रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाला धमकीचा फोन
18
मोठा हलगर्जीपणा! रुग्णालयात मृत्यूनंतर रुग्णाचा डोळाच गायब; डॉक्टर म्हणतात, उंदराने कुरतडला
19
Naga Chaitanya Wedding: नागा चैतन्य आणि शोभिताच्या लग्नाची पत्रिका व्हायरल, 'वेडिंग डेट' आली समोर
20
साहेबांच्या कारकिर्दीपेक्षा अधिक कामे माझ्या काळात; अजित पवारांचा दावा

शहरातील ४६२ धार्मिक स्थळांवर होणार कारवाई  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 11, 2017 6:20 AM

मुंबई उच्च न्यायालयाने अनधिकृत धार्मिक स्थळांवर कारवाई करण्याचे आदेश स्थानिक स्वराज्य संस्थांना दिले आहेत. मनपा क्षेत्रामधील ४६२ धार्मिक स्थळांवर कारवाई होणार असून यामधील तब्बल ३३५ सिडकोच्या जागेवर बांधण्यात आली आहेत.

नवी मुंबई : मुंबई उच्च न्यायालयाने अनधिकृत धार्मिक स्थळांवर कारवाई करण्याचे आदेश स्थानिक स्वराज्य संस्थांना दिले आहेत. मनपा क्षेत्रामधील ४६२ धार्मिक स्थळांवर कारवाई होणार असून यामधील तब्बल ३३५ सिडकोच्या जागेवर बांधण्यात आली आहेत.अनधिकृत धार्मिक स्थळांवर १७ नोव्हेंबर २०१७ पर्यंत कारवाई करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. याविषयी कार्यवाही करण्यासाठी महापालिका आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली महानगरपालिका स्तरीय समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीची आढावा बैठक गुरूवारी मनपा मुख्यालयामध्ये आयोजित केली होती. आयुक्त डॉ. रामास्वामी एन. यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीमध्ये अतिरिक्त आयुक्त अंकुश चव्हाण, महानगरपालिका, सिडको, एमआयडीसी, वन, कांदळवन, रेल्वे प्रशासनाचे व पोलीस अधिकारी उपस्थित होते.नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील अनधिकृत धार्मिक स्थळांची यादी यापूर्वीच ३१ डिसेंबर २०१६ मध्ये वर्तमानपत्रामध्ये प्रसिद्ध करण्यात आली होती. महापालिकेच्या जागेवर सद्यस्थितीमध्ये १७, सिडकोच्या जागेवर ३३५, एमआयडीसीच्या जागेवर १००, वन विभागाच्या जागेवर ७, कांदळवन विभागाच्या जागेवर १, रेल्वे प्राधिकरणाच्या जागेवर २ धार्मिक स्थळे आहेत. या बैठकीमध्ये याविषयी आतापर्यंत झालेल्या कार्यवाहीचा आढावा घेण्यात आला. न्यायालयाने दिलेल्या विहित मुदतीत कार्यवाही करण्याचे समिती अध्यक्ष तथा महापालिका आयुक्तांमार्फत निर्देशित करण्यात आले.शासकीय कार्यालयातील धार्मिक स्थळेही संबंधित कार्यालय प्रमुखांनी स्वत:हून काढावीत, असेही यावेळी सूचित करण्यात आले. शासन निर्देशानुसार अनधिकृत धार्मिक स्थळांबाबत मुदतीत कार्यवाही करण्याचे स्पष्ट निर्देश आयुक्त डॉ. रामास्वामी एन. यांनी या बैठकीत दिले आहेत.