प्लास्टिकबंदीचे उल्लंघन केल्यास होणार कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 27, 2018 06:27 AM2018-04-27T06:27:50+5:302018-04-27T06:27:50+5:30
पनवेल महापालिका सचिवांच्या वाढदिवसानिमित्त अधिकाºयांना पार्टी देण्यात आली.
पनवेल : महापालिकेचे नगरसचिव अनिल जगधणी यांच्या वाढदिवसाच्या पार्टीमध्ये प्लास्टिक प्लेटचा वापर केल्याचे वृत्त ‘लोकमत’ने गुरुवारच्या अंकात प्रसिद्ध केले. या वृत्ताची गंभीर दखल प्रशासनाने घेतली आहे. प्लास्टिकबंदीचा ठराव करणारी पनवेल देशातील पहिली महापालिका आहे. राज्य शासनानेही प्लास्टिकबंदी जाहीर केली असून, त्या आदेशाची तंतोतंत अंमलबजावणी झाली पाहिजे. अधिकारी व कर्मचाऱ्यांनी प्लास्टिकचा वापर केल्याचे निदर्शनास आल्यास त्यांच्यावरही कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला आहे.
पनवेल महापालिका सचिवांच्या वाढदिवसानिमित्त अधिकाºयांना पार्टी देण्यात आली. या वेळी प्लास्टिकच्या प्लेटमध्ये सर्वांना जेवण देण्यात आले. या विषयी ‘लोकमत’ने छायाचित्रासह वृत्त प्रसिद्ध केले. शहरामध्ये प्लास्टिकचा वापर करणाºयांवर कारवाई करणारे महापालिकेचे अधिकारी व कर्मचारीच प्लास्टिक वापरत असल्यामुळे शहरवासीयांनी नाराजी व्यक्त केली. पालिकेच्या अधिकारी व कर्मचाºयांनी सर्वप्रथम प्लास्टिकचा वापर थांबवावा, अशी मागणी होऊ लागली आहे. याची गंभीर दखल प्रशासनाने घेतली आहे. उपआयुक्त संध्या बावनकुळे यांनी अधिकारी व कर्मचाºयांसाठी परिपत्रक काढले आहे. प्लास्टिकबंदीच्या निर्णयाची प्रभावी अंमलबजावणी केली जात असल्याचे सांगण्यात आले आहे. ‘लोकमत’ने २६ एप्रिल रोजी प्रकाशित केलेल्या वृत्ताचा उल्लेख करीत पालिकेतील कर्मचारी व अधिकारी प्लास्टिक पिशव्या व थर्माकॉलचा वापर करीत असल्याचे नमूद केले आहे. राज्य शासनाच्या
दि. २ जानेवारी २०१८ रोजीच्या आदेशानुसार प्लास्टिक थर्माकॉलपासून बनविण्यात येणाºया वस्तू उदा. ताट, प्लेट्स, कप्स, ग्लास, वाट्या, चमचे यांचा वापर, साठवणूक, वितरण, विक्री आदीवर निर्बंध घालण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे.