पनवेल : विद्युत पुरवठा खंडित प्रकरणावरून काही जणांनी खारघर टेकडीवर असलेल्या फणसवाडी या आदिवासी पाड्यातील चार तरुणांना बेदम मारहाण केली. या प्रकरणी ८ जणांवर मारहाण व अॅट्रॉसिटी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना १६ तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.खारघर गावातील कुणाल सदाशिव पाटील यांचे फणसवाडी पाड्याला लागून फॉर्महाउस आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार फॉर्महाउसवर एका तरु णाची वाढदिवसाची पार्टी सुरू होती. फॉर्महाउसवर वीजजोडणी घेण्यात आलेल्या विद्युतखांबावरून आगीचे गोळे दिसू लागल्याने फणसवाडी पाड्यातील ग्रामस्थांनी महावितरणच्या कर्मचाऱ्यांना माहिती दिली. कर्मचाºयांनी येवून फॉर्महाउसवरील विद्युत पुरवठा खंडित केला. पाड्यातील तरु णाने महावितरणला माहिती दिल्याचा राग धरून फॉर्महाउसवर पार्टी करीत असलेले कुणाल पाटील, अंकुश शामराव गिरी, गोरखनाथ पांडुरंग पाटील, राजेश पदू पाटील, प्रणव सुनील कासारे, अरु ण पाटोळे, संतोष होळकर, नरसू ऊर्फ नरसिंह भगवान पाटील आदी व्यक्तीने पाड्यातील नामदेव बबन पारधी, महादेव पारधी, रामा पारधी आणि संतोष भले या चार तरु णांना लाकूड फाटा आणि लोखंडी सळीने मारहाण केली. या मारहाणीत नामदेव आणि संतोष यांच्या डोक्याला टाके बसले आणि महादेव आणि रामा या दोघांना बेदम मारहाण केली. या सर्वांवर उपचार करून सोडून देण्यात आले आहे.खारघर पोलिसांनी जीवे ठार मारण्याची धमकी देणे,धारधार हत्याराने मारहाण आण िजीवे मारहाण आदि कलाम खाली आण िअनुसूचित जाती,जमाती अत्याचार प्रतिबंध कायदा कारवाई केली आहे.या प्रकरणी तपास करणारे सहाय्यक पोलीस आयुक्त प्रकाश निलेवाड म्हणाले आठही आरोपींना सोळा तरीखे पर्यंत पोलीस कोठडी थोटावण्यात आली असून कायद्यानुसार योग्य ती कारवाई केली जाईल असे स्पष्ट केले.
खारघरमध्ये आदिवासी तरुणांना बेदम मारहाण, आठ जणांविरोधात अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2018 2:56 AM