- अरुणकुमार मेहत्रेकळंबोली : मावळ लोकसभा मतदारसंघातील पनवेल विभागातील मतदारांची संख्या पाच लाखांच्याही वर गेली आहे. त्यामुळे हा मतदारसंघ केवळ मावळमध्येच नाही, तर संपूर्ण महाराष्ट्रासाठी महत्त्वाचा ठरत आहे. मतदारसंख्येबरोबरच येथील मतदान केंद्रातही वाढ झाली आहे. त्यामुळे निवडणूकविभागाला पनवेलमध्ये अधिक आव्हानात्मक काम करावे लागत आहे.मावळमधील एकूण सहा विधानसभा मतदारसंघाचा विचार करायचा झाला तर पिंपरी, चिंचवड व पनवेलला शहरी वसाहती आहेत. यात पनवेलचे नागरीकरण झपाट्याने वाढत आहे. लोकसंख्येबरोबरच मतदारांची संख्याही वाढत असल्याची नोंद सरकार दप्तरी दिसत आहे. पनवेल विधानसभा मतदारसंघात ग्रामीण भागाच्या तुलनेत शहरी लोकसंख्या वाढत आहे. २०१४ च्या तुलनेत पनवेलमध्ये एक लाख ४३ हजार इतके मतदार पाच वर्षांत वाढले आहेत, त्यामुळे मावळमध्ये इतर मतदारसंघाच्या तुलनेत पनवेलकडे प्रमुख उमेदवारांनी लक्ष केंद्रित केले आहे. राज्याच्या इतर विधानसभा मतदारसंघाचा विचार करता जास्तीत जास्त पावणेपाच लाख तर कमीत कमी अडीच लाख इतकी मतदारसंख्या आहे. मात्र, पनवेल विधानसभा मतदारसंघात हा आकडा पाच लाख १४ हजारांवर पोहोचला आहे. येऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीत मतदार संख्या सव्वापाच लाखांच्या घरात पोहोचेल, असे निवडणूक विभागातील कर्मचाऱ्यांकडून सांगण्यात येत आहे.>भावी काळात दोन विधानसभा मतदारसंघपूर्वी पनवेल-उरण असा विधानसभा मतदारसंघ होता. २००९ मध्ये संपूर्ण देशातील मतदारसंघांची पुनर्रचना झाली. त्यामध्ये पनवेल आणि उरण हे स्वतंत्र विधानसभा मतदारसंघ झाले. २०१४ मध्ये पनवेलमध्ये ३,७१,१९३ इतके मतदार होते. आता ते ५,१४,७५९ इतके झाले आहेत. पुढील वर्षांत त्यात आणखी भर पडेल. त्यामुळे भावी काळात पुनर्रचनेत पनवेल येथे दोन विधानसभा मतदारसंघ होतील, असे मत प्रशासनात काम करणाºया अधिकाऱ्यांनी ‘लोकमत’कडे व्यक्त केले आहे.
मतदारांबरोबरच मतदान केंद्रांची संख्याही सर्वाधिक
By ऑनलाइन लोकमत | Published: April 18, 2019 11:50 PM