शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: वर्चस्वाच्या लढाईत मुंबईवर कोणाचे राज्य?; महामुंबईतील लढतींचा लक्ष्यवेध 
2
राहुल गांधींनी कोर्टात हजर राहावे; वीर सावरकर बदनामी प्रकरणी पुणे कोर्टाचे आदेश
3
ISRO आणि SpaceX ची भागीदारी यशस्वी, इलॉन मस्क यांनी लॉन्च केलं भारताचं सॅटेलाइट
4
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: फसव्या व्यवहारामुळे संघर्ष होण्याची शक्यता!
5
पुतिन, झेलेन्स्कींनी मला भेटून तोडगा काढावा; तिसरे महायुद्ध टाळायलाच हवे -डोनाल्ड ट्रम्प
6
नेत्यांच्या प्रचारतोफा थंडावल्या, आता उद्या मतदारांची तोफ चालणार
7
लॉरेन्स बिष्णोईचा भाऊ अनमोल बिष्णोईला अमेरिकेत अटक
8
माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर हल्ला; डोक्याला गंभीर दुखापत
9
धर्म धोक्यात नाही तर आरक्षण धोक्यात आहे, श्रीकृष्ण आयोग लागू करा -प्रकाश आंबेडकर
10
लुटारू आणि सर्वसामान्य जनता यांच्यातील लढाई; राहुल गांधी यांचा सत्ताधाऱ्यांवर हल्ला
11
हिंसाचारग्रस्त मणिपुरात आणखी ५ हजारांवर जवान करणार तैनात; गृहमंत्री अमित शाहांनी घेतला आढावा
12
मणिपूरच्या असह्य वेदना; बिरेन सिंह सरकारबद्दल निर्णय घेण्याची गरज!
13
तिकडे डोनाल्ड ट्रम्प.. आणि इकडे नरेंद्र मोदी
14
निवडणूक निकालानंतर बेकायदा होर्डिंग्ज लावल्यास कारवाई करा; हायकोर्टाचे राज्य सरकार, पोलीस प्रमुखांना निर्देश
15
आमदार प्रताप अडसड यांच्या भगिनीवर चाकूहल्ला; तर जळगावात उमेदवारावर गोळीबार
16
तिकडे ते गोड, इकडे नावडते असे का?, राहुल गांधी यांना विनोद तावडेंचा सवाल; काँग्रेस नेते-अदानींचे दाखवले फोटो
17
विशेष लेख: अझरबैजानमधल्या हवामानबदल परिषदेवर चिंतेचे मळभ!
18
...मग सत्ताधारी कोणासाठी राज्य चालवतात?; शरद पवार यांचा सवाल
19
Maharashtra Election 2024: पैशांचा बाजार! २०१९च्या तुलनेत पाचपट रक्कम जप्त
20
काँग्रेसची आश्वासने  निवडणुकीपुरतीच; देवेंद्र फडणवीस यांचा सोयाबीन भावावरून पलटवार

कोरलवाडी आदिवासींच्या रस्त्याला प्रशासकीय मंजुरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 10, 2020 12:05 AM

इतर मागण्याही तत्त्वत: मान्य; उपोषण पुकारल्याने प्रशासनाची उडाली तारांबळ

पनवेल : वारंवार पत्रव्यवहार आणि मोर्चे काढूनही स्वातंत्र्याच्या ७३ वर्षांनंतरही कोरलवाडी आदिवासींना रस्ता, पाणी आणि शिक्षण यांसारख्या मूलभूत सुविधा नाकारणाऱ्या प्रशासकीय यंत्रणेचा निषेध नोंदवून, रविवारी जागतिक आदिवासी दिनी कोरलवाडी आदिवासी बांधवांनी प्रांत कार्यालयासमोर उपोषणाचे हत्यार उपसले. यानंतर शासकीय पातळीवर हालचालींना वेग येऊन आदिवासी वाडीच्या रस्त्याचा मार्ग मोकळा झाला आहे.ग्रामसंवर्धन सामाजिक संस्थेचे अध्यक्ष समाजसेवक संतोष ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली गुरुदास वाघे, संतोष पवार, हरिश्चंद्र वाघे, रमेश वाघे, राजेश वाघे, भानुदास पवार, शकुंतला पवार, गोंदीबाई वाघे, बेबी दशरथ वाघे ग्राम संवर्धन सामजिक संस्थेचे कार्यकर्ते उदय गावंड, राजेश रसाळ यांनी पनवेल प्रांत कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरू केले होते. या उपोषणाच्या हत्याराने बावीस दिवस निद्रिस्त असलेल्या महसूल विभागाची मात्र धावपळ उडाली आणि दुपारनंतर पनवेलचे निवासी नायब तहसीलदार संजय मांडे, मंडळ अधिकारी मनीष जोशी, तलाठी कविता बळी आणि कर्नाळा तलाठी बलभीम लाटे यांच्यासह उपोषण स्थळी भेट देत, मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक १७( नवीन ६६) ते कोरलवाडी आदिवासी वाडीच्या रस्त्याला एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प पेणद्वारा २०२०-२१ या आर्थिक वर्षात ७ लाख ५० हजारांच्या आराखड्यास प्रशासकीय मंजुरी देण्यात आली. त्याचप्रमाणे, रस्त्याचे डांबरीकरण करण्यासंबंधी शासन स्तरावर तत्काळ कारवाई करण्यात येईल, असे सांगण्यात आले.१३ आॅगस्ट रोजी पनवेलच्या उपविभागीय अधिकारी कार्यालयात बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.