योगेश पिंगळे नवी मुंबई : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या वतीने २0१९ मध्ये घेण्यात आलेल्या राज्यसेवा मुख्य परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला आहे. या परीक्षेत नेरुळ येथील श्रुतीशा पटाडे (२५) यांनी उज्वल यश संपादन केले असून त्यांची उपजिल्हाधिकारी पदावर निवड झाली आहे. शासनाच्या माध्यमातून देण्यात येणारी जबाबदारी सकारात्मक रीतीने सांभाळून प्रशासकीय ध्येय धोरणांची प्रभावीपणे अंमलबजावणी करणार असल्याचा निर्धार श्रुतीशा यांनी लोकमतकडे व्यक्त केला आहे.आपण समाजाचे काहीतरी देणं लागतो.परंतु त्यासाठी काहीतरी करण्याची संधी हि प्रशासनातूनच मिळेल या भावनेतून इंजिनियरिंग केल्यावर श्रुतीशा यांनी नोकरी न करता पूर्णवेळ स्पर्धा परीक्षांचा जिद्दीने अभ्यास केला. राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत त्यांना घवघवीत यश देखील मिळाले असून उपजिल्हाधिकारी पदासाठी निवड झाली आहे. या यशामुळे श्रुतीशा यांचे प्रशासकीय अधिकारी होण्याचे स्वप्न अखेर पूर्ण झाले आहे. श्रुतीशा यांचे बालपण नवी मुंबईत गेले असून वाशीतील फादर अॅग्नेल शाळेत शिक्षण झाले आहे. वडील सुभाष पटाडे एका खाजगी कंपनीत नोकरी करीत असून आई सविता पटाडे गृहिणी आहेत. दहावीनंतर विविध पुस्तके, वर्तमानपत्र आदी अवांतर वाचनातून आपल्याला चांगल्या प्रकारे माहिती मिळते त्यातूनच प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या कामाबाबत कुतूहल निर्माण झाल्याचे श्रुतीशा यांनी सांगितले. प्रशासकीय अधिकारी होऊन चांगलं काम करता येऊ शकते. तसेच या कामात खूप संधी आहेत. परंतु हे काम एक आव्हानात्मक असल्याचे देखील त्यांच्या लक्षात आले होते. परंतु प्रशासकीय अधिकारी होण्याचे स्वप्न प्रत्यक्षात साकार करायचे असल्याने त्याअनुषंगाने त्यांनी प्रयत्न करून यश संपादन केले. आहे. मुंबईसारख्या ठिकाणी घरी अभ्यास करणे जरा कठीण असल्याने लायब्ररीमध्ये जाऊन त्यांनी अभ्यास केला होता. स्वप्न गाठण्यासाठी चिकाटीने केलेल्या मेहनतीचे फळ श्रुतीशा यांना मिळाले आहे. सकारात्मक दृष्टीकोनातून उपजिल्हाधिकारी पदावर काम करणार असून शासनाने दिलेली जबाबदारी १00 टक्के देऊन पूर्ण करण्याचा प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले. प्रशासनाची ध्येय, धोरणे, योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्याचा प्रयत्न करणार असून जास्तीत जास्त महिलांचे सक्षमीकरण करण्याचा प्रयत्न करणार असल्याचे श्रुतीशा यांनी सांगितले. महिला स्वत:च्या पायावर उभ्या राहाव्यात यासाठी महिलांना शिक्षण, प्रशिक्षण, रोजगार उपलब्ध करून देणं हे सर्व शासनामार्फत जेवढं शक्य होईल तेवढं करण्याचा नक्की प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितलं जीवनात आपण आपले ध्येय निश्चित केले तर आपण परिस्थिती नक्कीच बदलू त्यासाठी जिद्द, चिकाटी, विश्वासाची साथ हवी. ध्येय पूर्ण करण्यासाठी चांगले प्रयत्न देखील आवश्यक असून आपल्या आयुष्यात येणाºया प्रत्येक गोष्टीकडे संधी म्हणून बघा. यश हमखास आहे. असा सल्ला त्यांनी स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणाºया तरुणाईला दिला आहे. श्रुतीशा यांच्या यशाबद्दल त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.>श्रुतीशा यांचे बालपण नवी मुंबईत गेले असून वाशीतील फादर अॅग्नेल शाळेत शिक्षण झाले आहे. वडील सुभाष पटाडे एका खाजगी कंपनीत नोकरी करीत आहेत.
प्रशासकीय ध्येय धोरणांची प्रभावीपणे अंमलबजावणी करणार
By ऑनलाइन लोकमत | Published: June 25, 2020 11:55 PM