एलिफंटा बेटावरील दोन गावे अंधारात, वीजपुरवठा पूर्ववत करण्याचे प्रशासनाचे आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 22, 2017 02:41 AM2017-11-22T02:41:55+5:302017-11-22T02:42:04+5:30

उरण : एलिफंटा बेटावरील दोन गावांना वीजपुरवठा करणारे जनरेटर मागील २४ दिवसांपासून बंद पडल्याने बेटावरील गावे अंधारात बुडाली आहेत.

Administrative order to restore the electricity supply to two villages of the Elephanta, in the dark | एलिफंटा बेटावरील दोन गावे अंधारात, वीजपुरवठा पूर्ववत करण्याचे प्रशासनाचे आदेश

एलिफंटा बेटावरील दोन गावे अंधारात, वीजपुरवठा पूर्ववत करण्याचे प्रशासनाचे आदेश

Next

उरण : एलिफंटा बेटावरील दोन गावांना वीजपुरवठा करणारे जनरेटर मागील २४ दिवसांपासून बंद पडल्याने बेटावरील गावे अंधारात बुडाली आहेत. एमटीडीसीच्या हलगर्जीपणामुळे जनरेटरची दुरुस्ती झाली नसल्याने बेटावरील दोन गावांना सव्वातीन तासच आलटून-पालटून वीजपुरवठा करण्याची पाळी एमटीडीसीवर येऊन ठेपली आहे. यामुळे ग्रामस्थ संतप्त झाले आहेत. या ग्रामस्थांनी ग्रामपंचायत सदस्य बळीराम ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली एमटीडीसीचे एमडी आणि डेप्युटी एमडी बी.के . जैस्वाल यांची मंगळवारी भेट घेतली. ग्रामस्थांच्या भेटीनंतर जनरेटरची तत्काळ दुरुस्ती करून, वीजपुरवठा पूर्ववत करण्याचे आदेश एमटीडीसीचे एमडी विजय वाघमारे यांनी दिले आहेत.
एलिफंटा बेटाला कायमस्वरूपी वीजपुरवठा करण्याच्या सुमारे २५ कोटी खर्चाच्या प्रकल्पाचे काम सुरू आहे. मागील वर्षापासून सुरू झालेले काम अद्याप पूर्ण झालेले नाही. त्यामुळे २५ वर्षांपासूनच एलिफंटा बेटावरील तिन्ही गावांना विद्युत जनित्रांद्वारे विद्युत पुरवठा केला जात होता. यापैकी मोरा गावासाठी सुमारे साडेपाच कोटी रुपये खर्च करून शासनाने सौरऊर्जा प्रकल्प उभारला होता. मात्र, सुरू झालेल्या सौरऊर्जा प्रकल्पाची देखरेख करण्यात शासनाला अपयश आल्याने, तो प्रकल्प कालांतराने बंद पडला असून, बेटावरील मोरा बंदर गाव आजतागायत अंधारातच आहे. उरलेल्या राजबंदर आणि शेतबंदर या दोन्ही गावांना विद्युत जनित्रांमार्फत संध्याकाळी सव्वातीन तास वीजपुरवठा केला जात होता. मात्र, दोन जनरेटरपैकी १६० के व्ही क्षमतेचे जनरेटर २९ आॅक्टोबरपासून बंद पडलेले आहे. त्यामुळे मागील २४ दिवसांपासून १०० केव्ही विद्युत क्षमतेच्या जनरेटरवरून सध्या बेटावरील राजबंदर व शेतबंदर या दोन गावांना आलटून पालटून वीजपुरवठा केला जात आहे.
याबाबत ग्रामस्थांनी एलिफंटा येथील एमटीडीसीचे व्यवस्थापक सुदर्शन घरत यांच्याकडे विचारणा केली असता, जनरेटर दुरुस्तीसाठी पार्ट उपलब्ध होत नसल्याचे, जनरेटर बंद असल्याचे त्यांच्याकडून सांगण्यात आले असल्याची ग्रामस्थांची तक्रार आहे. मात्र, ग्रामस्थांना एमटीडीसी व्यवस्थापकाकडून समाधानकारक उत्तर न मिळाल्याने मंगळवारी ग्रामपंचायत सदस्य आणि नवनिर्वाचित सरपंच बळीराम ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली संतप्त झालेल्या ग्रामस्थ आणि नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्यांनी थेट एमटीडीसीचे एमडी विजय वाघमारे यांची भेट घेऊन तक्रार केली.
या वेळी नवनिर्वाचित ग्रा. पं. सदस्य सचिन म्हात्रे, भरत पाटील, मंगेश आवटे, उपसरपंच विजेंद्र घरत, घारापुरी द्विप विकास आघाडीचे पदाधिकारी रमेश पाटील, सखाराम घरत, रमेश शेवेकर, श्रीधर घरत उपस्थित होते.
एमडी भडकले
मागील २४ दिवसांपासून दुरुस्तीअभावी जनरेटर बंद पडल्याची कोणतीही माहिती एलिफंटा येथील एमटीडीसीच्या कर्मचाºयांनी दिली नसल्याचे समजताच, एमटीडीसीचे एमडी विजय वाघमारे कर्मचाºयांवर भडकले.
ही गंभीर बाब निदर्शनास आणून न दिल्याबाबत संबंधित विभागाचे कर्मचारी आणि अधिकाºयांनाही वाघमारे यांनी चांगलेच फैलावर घेतले.
तत्काळ संबंधित विभागाच्या अभियंत्यांचे पथक एलिफंटा येथे पाठवून जनरेटरची दुरुस्ती करून वीज पूर्ववत सुरू करण्याचे आदेशही वाघमारे यांनी संबंधित अधिकारी, कर्मचाºयांना दिले आहेत.

Web Title: Administrative order to restore the electricity supply to two villages of the Elephanta, in the dark

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.