अॅडमिशच्या बहाण्याने 40 लाखांना फसवले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 23, 2017 02:44 AM2017-11-23T02:44:36+5:302017-11-23T02:45:07+5:30
पनवेल : तुमच्या मुलीला मेडिकल शाखेत अॅडमिशन घेऊन देतो, असे सांगून एका दाम्पत्याने पनवेलमधील एका व्यक्तीस साडेतेवीस लाखांना फसविल्याची घटना घडली आहे.
Next
पनवेल : तुमच्या मुलीला मेडिकल शाखेत अॅडमिशन घेऊन देतो, असे सांगून एका दाम्पत्याने पनवेलमधील एका व्यक्तीस साडेतेवीस लाखांना फसविल्याची घटना घडली आहे.
पनवेलमध्ये राहणारे संजय साळवी यांना तुमच्या मुलीला मेडिकल शाखेमध्ये अॅडमिशन घेऊन देतो, यासाठी संदीप जाधव व त्याची पत्नी वैशाली (रा. येरवडा, पुणे), यांनी ४० लाख रुपये घेतले; परंतु अॅडमिशनचे काम केले नाही. त्यामुळे संजय साळवी हे त्यांच्या मागे लागले असता त्यांनी आतापर्यंत साडेसोळा लाख रु पये परत केले; परंतु उर्वरित रक्कम वारंवार मागूनसुद्धा परत न केल्याने यासंदर्भात तक्रार पनवेल शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली.