भाजीपाल्याच्या दुनियेत ‘स्वस्ताई’; वाटाणा, गाजर, टोमॅटोसह अनेक भाज्या आता ऐटीत घरात येतील?
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 15, 2025 12:29 IST2025-01-15T12:29:30+5:302025-01-15T12:29:38+5:30
सोमवारी ४०१ टन व मंगळवारी ३०१ टन, तर फ्लॉवरचीही दोन दिवसात ७८० टन आवक झाली आहे.

भाजीपाल्याच्या दुनियेत ‘स्वस्ताई’; वाटाणा, गाजर, टोमॅटोसह अनेक भाज्या आता ऐटीत घरात येतील?
नवी मुंबई : नवीन वर्षाच्या सुरुवातीपासूनच भाजीपाल्याचे दर नियंत्रणात येण्यास सुरुवात झाली आहे. आवक वाढल्याने दर कमी झाले असून, ग्राहकांना दिलासा मिळाला आहे. वाटाणा, गाजर, टोमॅटो, फ्लॉवरसह बहुतांश सर्व वस्तूंचे दर नियंत्रणात आले आहेत.
बाजार समितीमध्ये संक्रांतीमुळे दोन दिवसात गाजराची विक्रमी आवक झाली आहे.
सोमवारी ४०१ टन व मंगळवारी ३०१ टन, तर फ्लॉवरचीही दोन दिवसात ७८० टन आवक झाली आहे. याशिवाय टोमॅटोची दोन दिवसात ४६० टन आवक आला आहे. पालेभाज्यांचे दरही नियंत्रणात आले आहेत. बाजार समितीमध्ये ७ ते १० व किरकोळ मार्केटमध्ये २० रुपये जुडीप्रमाणे भाजी उपलब्ध होत आहे.
बाजार समितीमध्ये भाज्यांची आवक मोठ्या प्रमाणात होत आहे. यामुळे बाजारभाव कमी होण्यास सुरुवात झाली आहे. टोमॅटो, फ्लॉवर, घेवडा, काकडी सर्वांचे दर सामान्यांच्या आवाक्यात आले आहेत.
- स्वप्नील घाग, भाजीपाला विक्रेते
भाजी होलसेल किरकोळ
वाटाणा ३२ ते ३६ ५० ते ६०
गाजर २४ ते ३६ ४० ते ५०
टोमॅटो ८ ते १५ ३० ते ४०
दुधी भोपळा १२ ते २४ ५० ते ६०
फरसबी ३० ते ४० ७० ते ८०
फ्लॉवर ६ ते ८ ३० ते ४०
घेवडा १२ ते १६ ४० ते ५०
काकडी १० ते २४ ४० ते ५०
कारली २४ ते ३४ ४० ते ५०