ड्रग्ज तस्करीत आता आफ्रिकनचा सहभाग; तिघांकडून सव्वा कोटीचे अमली पदार्थ जप्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 14, 2025 06:16 IST2025-02-14T06:16:13+5:302025-02-14T06:16:13+5:30

११ जणांचे बेकायदा वास्तव्य

Africans now involved in drug trafficking; Drugs worth Rs 1.25 crore seized from three | ड्रग्ज तस्करीत आता आफ्रिकनचा सहभाग; तिघांकडून सव्वा कोटीचे अमली पदार्थ जप्त

ड्रग्ज तस्करीत आता आफ्रिकनचा सहभाग; तिघांकडून सव्वा कोटीचे अमली पदार्थ जप्त

नवी मुंबई : गुन्हे शाखा पोलिसांनी गुरुवारी पहाटे ११ ठिकाणी छापे मारून एक कोटी १० लाखांचे अमली पदार्थ जप्त केले. या प्रकरणी तिघा आफ्रिकन नागरिकांना अटक केली असून, त्यात दोन पुरुष व एक महिला आहे. त्याशिवाय बेकायदेशीर वास्तव्य करणारे ११ जण पोलिसांच्या हाती लागले असून, त्यांना देश सोडण्याची नोटीस बजावली आहे. ड्रग्जविरोधी मोहिमेंतर्गत उलवेत कोम्बिंग ऑपरेशन राबवून पोलिसांनी ही कारवाई केली.

नवी मुंबईत ड्रग्जविरोधी अभियान प्रभावीपणे सुरू आहे. त्याच अनुषंगाने पोलिस आयुक्त मिलिंद भारंबे, अपर आयुक्त दीपक साकोरे आदींच्या नेतृत्वाखाली उलवे परिसरातील आफ्रिकन व्यक्तींच्या हालचालीवर अमली पदार्थ विरोधी पथकाकडून पाळत ठेवली होती. त्यातून सहायक आयुक्त भाऊसाहेब ढोले यांनी वरिष्ठ निरीक्षक संदीप निगडे यांच्या माध्यमातून गुरुवारी पहाटे परिसरात कोम्बिंग ऑपरेशन राबवले. 

उलवे पोलिसांत गुन्हा 
१२५ अधिकारी व कर्मचाऱ्यांचे पथक केले होते. त्यांनी उलवे परिसरात आफ्रिकन व्यक्तींचे वास्तव्य असलेल्या ११ ठिकाणी धडक दिली. यावेळी प्रत्येक विदेशी व्यक्तीकडे कागदपत्रांची चौकशी करून त्यांच्या साहित्याची झाडाझडती घेण्यात आली. यामध्ये तिघांकडे एक कोटी १० लाखांचे अमली पदार्थ मिळून आले. त्यात ५९ लाख २४ हजारांचे ११८.४८ ग्रॅम कोकेन, ५० लाख ४२ हजारांचे १००.८४ ग्रॅम एमडी व ४३ हजारांच्या रोकडचा समावेश आहे. या तिघांवर उलवे पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

३५ आफ्रिकन व्यक्तींची पोलिसांनी केली चौकशी
पोलिसांना ३५ आफ्रिकन व्यक्तींच्या चौकशीत ११ जणांचा व्हिजा संपलेला असतानाही ते बेकायदेशीर वास्तव्य करीत असल्याचे आढळले. या विदेशी नागरिकांना आश्रय देणाऱ्या घरमालकांनी पोलिसांना कळविले होते का हे पडताळून तसे झाले नसल्यास घरमालकांवर गुन्हे दाखल होणार आहेत. 

ठाण्यातून तिघांना अटक
दाेन काेटींच्या मेफेड्राॅन (एमडी) ड्रग्जच्या तस्करीसाठी डायघर भागात आलेल्या सैफ अली खान, अमन खान आणि इलियाज खान या तीन तस्करांना अटक केल्याची माहिती ठाणे गुन्हे शाखेने दिली. त्यांच्याकडून तब्बल एक हजार १०० ग्रॅम वजनाचे एमडी हस्तगत केले. 
डायघर भागात एमडी ड्रग्ज विक्रीसाठी काही जण येणार असल्याची माहिती अमली पदार्थ विराेधी पथकाचे वरिष्ठ पाेलिस निरीक्षक गाेरखनाथ घार्गे यांना मिळाली हाेती. त्यानुसार पथकाने १२ फेब्रुवारीला सायंकाळी कारवाई केली.

Web Title: Africans now involved in drug trafficking; Drugs worth Rs 1.25 crore seized from three

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.