अखेर १६ दिवसांनी ‘मर्क्स’च्या कामगारांचे आंदोलन मागे

By ऑनलाइन लोकमत | Published: December 5, 2018 01:01 AM2018-12-05T01:01:30+5:302018-12-05T01:01:36+5:30

एपीएम टर्मिनल (मर्क्स) कंपनीविरोधात ९९ कामगारांनी कुटुंबासह सुरू केलेले उपोषण तब्बल १६ दिवसांनी मंगळवारी सुटले आहे.

After 16 days, the Mercantile Workers' Movement is back | अखेर १६ दिवसांनी ‘मर्क्स’च्या कामगारांचे आंदोलन मागे

अखेर १६ दिवसांनी ‘मर्क्स’च्या कामगारांचे आंदोलन मागे

Next

उरण : एपीएम टर्मिनल (मर्क्स) कंपनीविरोधात ९९ कामगारांनी कुटुंबासह सुरू केलेले उपोषण तब्बल १६ दिवसांनी मंगळवारी सुटले आहे. कामावरून कमी केलेल्या ९९ कंत्राटी कामगारांच्या प्रश्नावर केंद्रीय शिपिंग मंत्रालयाचे ओएसडी राजगोपाल शर्मा यांनी दिल्लीत संबंधितांना चर्चेसाठी बैठक बोलाविण्यात येईल, असे लेखी आश्वासन दिले आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि त्यांच्या मंत्रालयाकडून ९९ कामगारांना याबाबत आश्वासन देण्यात आलेले आहे. त्यामुळे कामगारांनी उपोषण मागे घेतल्याची माहिती हुतात्मा स्थानिक प्रकल्पग्रस्त संघर्ष समितीचे सल्लागार अ‍ॅड. भार्गव पाटील यांनी दिली. येथील एपीएम टर्मिनल (मर्क्स)मधील कमी केलेल्या ९९ कंत्राटी कामगारांनी कामावर घेण्याच्या मागणीसाठी १९ नोव्हेंबरपासून कुटुंबीयांसह उपोषणाचा मार्ग स्वीकारला होता.

Web Title: After 16 days, the Mercantile Workers' Movement is back

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.