नवी मुंबई : महापालिकेची स्थापना झाल्यानंतर २५ वर्षांनी शासनाकडून ३९३५ पदांच्या आकृतीबंधास मंजुरी मिळाली आहे. यापूर्वी ३२७९ पदे निर्मितीस शासनाने मंजुरी दिली असून उर्वरित ६५६ पदांसाठीही मंजुरी मिळाली आहे. शासनाच्या या निर्णयामुळे पालिकेच्या आरोग्य यंत्रणा बळकट होणार आहे. सर्वच विभागाला पुरेसे मनुष्यबळ उपलब्ध होणार असून शहरवासीयांना दर्जेदार सुविधा उपलब्ध करून देणे शक्य होणार आहे.नवी मुंबई हे देशातील दुसरे व राज्यातील पहिले सुनियोजित शहर आहे. मुंबई शहरावरील लोकसंख्येचा वाढता ताण कमी करण्यासाठी सुनियोजित व पायाभूत सोयी सुविधांनी सुसज्ज असे नवी मुंबई शहर वसविण्यात आले आहे. १७ डिसेंबर १९९१ च्या अधिसूचनेअन्वये महापालिकेची स्थापना करण्यात आली आहे.सद्यस्थितीमध्ये मनपा क्षेत्राची लोकसंख्या १५ लाखपेक्षा जास्त झाली आहे. झपाट्याने होणारे नागरीकरण, त्यामुळे पायाभूत सुविधांवर पडणारा ताण, राज्य व केंद्र शासनाच्या विविध योजना, नागरिकांची स्थानिक प्रशासनाकडून असलेली लोककल्याणकारी व पारदर्शी कामकाजाची मागणी यामुळे पालिकेचा अधिकारी, कर्मचाºयांची पदसंख्या व वर्गीकरणाचा आकृतीबंद मंजूर होणे आवश्यक होते. १९९२ पासून शासनाने वेळोवेळी ३२७९ पदांना मंजुरी दिली आहे. परंतु प्रत्यक्ष आकृतीबंधास मंजुरी मिळालेली नव्हती. यामुळे महापालिका प्रशासनाला कामकाज करताना तारेवरची कसरत करावी लागत होती. अनेक विभागांमध्ये कर्मचाºयांची संख्या अत्यंत कमी असल्याने ठोक मानधनावर कर्मचाºयांची नियुक्ती करण्यात आली होती. ६०० पेक्षा जास्त कर्मचारी ठोक मानधनावर घेण्यात आले होते.महापालिका आयुक्त रामास्वामी एन. यांनी पदभार स्वीकारल्यापासून शासनाकडे सातत्याने पाठपुरावा सुरू केला होता. नगरविकास विभागाच्या प्रधान सचिव मनीषा म्हैसकर यांच्याकडे याविषयी अनेक बैठका घेतल्या होत्या. अखेर २१ आॅगस्टला शासनाने महापालिकेच्या आकृतीबंधास मंजुरी दिली आहे. ३९३५ पदांचा आकृतीबंध मंजूर झाला आहे. यापूर्वी ३२७९ पदांना शासनाने मंजुरी दिली आहे. उर्वरित ६५६ नवीन पदांनाही मंजुरी दिली आहे. या मंजुरीमुळे प्रशासन, अभियांत्रिकी, आरोग्य सचिव, सर्व विभाग कार्यालयांसाठी आवश्यक पदांचा समावेश आहे.याशिवाय सुरक्षा, परवाना, पर्यावरण, विधि व आपत्ती व्यवस्थापन विभाग सक्षम करता येणार आहे. २००८ पासून तत्कालीन आयुक्तांमार्फत महानगरपालिकेची गरज लक्षात घेवून विभागनिहाय आवश्यक पदांच्या आकृतीबंधाचा प्रस्ताव शासन मंजुरीसाठी सादर करण्यात आला होता. दरम्यानच्या काळात त्यामधील विशेषत्वाने आरोग्य व अग्निशमन विभागातील विविध संवर्गातील पदनिर्मितीस शासन मंजुरीही प्राप्त झाली होती. आता आकृतीबंधासही मंजुरी मिळाल्यामुळे महापालिकेच्या प्रशासकीय अडचणी दूर होण्यास मदत होणार आहे.आयुक्तांच्या पाठपुराव्याला यशमहापालिका आयुक्त रामास्वामी एन. यांनी पदभार स्वीकारल्यापासून पालिकेचा आकृतीबंध मंजूर व्हावा यासाठी विशेष पाठपुरावा सुरू केला होता. नगरविकास विभागाच्या प्रधान सचिव मनीषा म्हैसकर यांच्याकडे वारंवार बैठका घेतल्या होत्या. महापालिकेचा आस्थापना खर्च २०.२५ टक्के एवढा असून इतर महापालिकांच्या तुलनेमध्ये तो सर्वात कमी असल्याचेही निदर्शनास आणून दिले होते. आयुक्तांच्या पाठपुराव्याला यश आले असून याचा फायदा शहरवासीयांना होणार आहे.महापालिकेच्या आकृतीबंधास शासनाने मंजुरी दिली आहे. याशिवाय ६५६ पदनिर्मितीसही मंजुरी मिळाली आहे. यामुळे आरोग्य, अग्निशमन विभागाला बळकटी येणार आहे. सुरक्षा, परवाना, पर्यावरण, विधि व आपत्ती व्यवस्थापन विभागाचे सक्षमीकरण करणे शक्य होणार आहे.- किरणराज यादव,उपआयुक्त, प्रशासनमहापालिकेच्या मंजूर आकृतीबंधाची माहितीविभाग मंजूर पदे नवनिर्मित एकूणआयुक्त कार्यालय ३ ४ ५अतिरिक्त आयुक्त कार्यालय १० ६ १६सामान्य प्रशासन विभाग ६७ १९ ८६सुरक्षा विभाग १३ १ १४माहिती व जनसंपर्क ४ २ ६विधि ४ ३ ७भांडार २ ३ ५अग्निशमन ४७५ ० ४७५आपत्ती व्यवस्थापन २ ३ ५करविभाग ९९ ९ १०८सचिव ११ ३ १४परिमंडळ १ ३३ १२ ४५परिमंडळ २ ३१ १३ ४४विभाग कार्यालय ३८४ २९२ ६७६वाहन व यांत्रिकी १७ ३ २०अभिलेख ३ २ ५घनकचरा व्यवस्थापन १७ १० २७उद्यान व वृक्ष प्राधिकरण ११ ५ १६समाजविकास १३ ४० ५३मालमत्ता ५ ८ १३क्रीडा व सांस्कृतिक ४ ८ १२ग्रंथालय ३ १६ १९निवडणूक १ ४ ५परवाना १ १० ११लेखा २३ ४४ ६७लेखा परीक्षण २० २४ ४४अतिक्रमण ३ १३ १६नगररचना २४ ११ ३५सार्वजनिक बांधकाम ५७ २० ७७सार्वजनिक आरोग्य अभियांत्रिकी २० ७ २७विद्युत १५ ६ २१पर्यावरण ९ २ ११आरोग्य १८५७ ३ १८६०ईटीसी ७ ४५ ५२शिक्षण विभाग २५ ४ २९एकूण ३२७९ ६५६ ३९३५स्थापनेपासून मंजूर पदांची माहितीवर्ष संख्यामार्च १९९२ ५एप्रिल ९९२ १२सप्टेंबर १९९३ १आॅक्टोबर १९९३ ७८जानेवारी २००२ १८फेब्रुवारी २००२ ३३जुलै २००६ १आॅक्टोबर २००६ १फेब्रुवारी २००७ १५५५जानेवारी २००८ ३५ जुलै २००८ १४२९ जुलै २००८ ४८आॅगस्ट २००८ १एप्रिल २०१३ २जानेवारी २०१५ २एप्रिल २०१६ १०८५मे २०१५ ४१९एकूण ३२७९
तब्बल २५ वर्षांनंतर आकृतिबंधास मान्यता, शासनाकडून ६५६ पदनिर्मितीसही मंजुरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 22, 2017 4:58 AM