दुर्घटनेनंतरही महावितरण निद्रिस्तच, घणसोलीसह ऐरोलीमध्ये परिस्थिती गंभीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 7, 2018 01:57 AM2018-06-07T01:57:22+5:302018-06-07T01:57:22+5:30

कळवा व सानपाडा येथील विद्युत उपकेंद्रांना आग लागल्यानंतरही महावितरण प्रशासनाला जाग आलेली नाही. शहरामध्ये अनेक ठिकाणी विद्युत डीपी उघड्या असून, केबल अस्ताव्यस्त पसरल्या आहेत.

 After the accident, Mahavitaran Nidrishch, Ghansoli and Airoli, the situation is serious | दुर्घटनेनंतरही महावितरण निद्रिस्तच, घणसोलीसह ऐरोलीमध्ये परिस्थिती गंभीर

दुर्घटनेनंतरही महावितरण निद्रिस्तच, घणसोलीसह ऐरोलीमध्ये परिस्थिती गंभीर

Next

- अनंत पाटील

नवी मुंबई : कळवा व सानपाडा येथील विद्युत उपकेंद्रांना आग लागल्यानंतरही महावितरण प्रशासनाला जाग आलेली नाही. शहरामध्ये अनेक ठिकाणी विद्युत डीपी उघड्या असून, केबल अस्ताव्यस्त पसरल्या आहेत. ऐरोली ते घणसोली दरम्यानची स्थिती बिकट असून, वेळेत उपाययोजना केल्या नाहीत तर गंभीर अपघात होऊन जीवितहानी होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
घणसोली गावठाण, ऐरोली, दिवा कोळीवाडामधील प्रमुख रस्त्यांवर आणि चौकांमध्ये महावितरणने उभ्या केलेल्या विद्युत रोहित्रांच्या डीपी उघड्याच असल्याने शाळकरी विद्यार्थी, तसेच वाहनधारकांबरोबरच पादचाऱ्यांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. घणसोली विभागात २५पेक्षा जास्त बॉक्स उघडे असल्याचे निदर्शनास आले आहे. घणसोली परिसरातील नागरिकांनी महापालिका आणि महावितरणकडे अनेक तक्रारी करूनही त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. महापलिकेचे सहायक आयुक्त आणि विद्युत विभागाचे कनिष्ठ अभियंता सखाराम खाडे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले की, उघड्या डीपी बॉक्सची समस्या कायम असून, महापालिकेच्या वतीने लेखी तक्र ार करून आता तीन आठवड्यांचा कालावधी उलटूनही गेला असल्याचे सांगितले.
दिवा-कोळीवाडा सेक्टर ९ येथे होळी मैदानाच्या शेजारी या अंतर्गत विजेचा दाब नियमन करण्यासाठी ठिकठिकाणी विद्युत रोहित्रांची उभारणी करण्यात आली आहे. येथील रोहित्रासह डीपी बॉक्स उघड्या अवस्थेत गेल्या अनेक वर्षांपासून आहे. घणसोली गावदेवी मंदिर, कोळीवाडा, शेतकरी शिक्षण संस्थेचे महाविद्यालय, पाटीलआळी, चिंचआळी, दत्तनगर, तळवली गाव, नोसिलनाका सेक्टर २१, छत्रपती शिवाजी तलाव, खदान तलाव, वैभव पतपेढी जवळ, रबाळे स्मशानभूमी, वीटभट्टी रोड, रबाळे रेल्वेस्थानक, गोठीवली महावितरण कार्यालयाजवळ, मासळी मार्केट साईबाबा मंदिर, गोल्डननगर, गोठीवली विठ्ठल-रखुमाई मंदिर यांच्यासह एकूण २५ डीपी बॉक्सची परिस्थिती अत्यंत गंभीर आहे. डीपीतील वीज तारा, उघडे फ्युज, सर्वसामान्य नागरिकांच्या हाताला येतील, अशा पद्धतीने हे बॉक्स आहेत, तसेच रस्त्याच्या कडेला एखादा अपघात झाला तर उघड्या डीपीवर वाहन आदळून मोठी घटनाही घडू शकते.
डीपीचे दरवाजे तारेने बांधलेले असल्याचे पाहावयास मिळतात. दिवा-कोळीवाडा होळी मैदान परिसरातील डीपीचे आणि जनित्रांचे दरवाजे वर्षाचे बाराही महिने खुलेच असल्यामुळे मोठी जीवितहानी होण्याची शक्यता टाळता येत नाही.

उघड्या डीपी बॉक्स आणि ओव्हरहेड जीर्ण केबल्स संदर्भात घणसोली विभागातील शेकडो लोकांच्या तक्र ारी महापालिकेकडे आलेल्या आहेत. त्यानुसार आम्ही ५० ठिकाणी सर्वेक्षण केले असता, यात २५ ठिकाणी नागरिकांच्या जीवितास धोका असल्याची गंभीर परिस्थिती आढळून आल्याने यासंदर्भात वीज महावितरण कंपनीकडे दुरु स्तीबाबत तीन आठवड्यापूर्वी लेखी तक्र ार केली आहे.
- दत्तात्रेय नागरे, सहायक आयुक्त, घणसोली, महापालिका

नवी मुंबई महापलिकेच्या वतीने तसेच नागरिकांच्या वतीने उघड्या डीपी बॉक्स विषयी महावितरणकडे लेखी तक्र ार करण्यात आलेली आहे. दुरु स्तीसाठी ठेकेदारामार्फत डीपी बॉक्स लॉकिंगचे आणि उघड्या केबल्स नव्याने बसविण्याचे काम सुरू आहे. येत्या काही दिवसांतच हे काम पूर्ण होणार असल्यामुळे उघड्या डीपीचा प्रश्न कायमचा सुटेल.
- दीपक शिंदे, सहायक अभियंता, वीज महावितरण ऐरोली विभाग.

Web Title:  After the accident, Mahavitaran Nidrishch, Ghansoli and Airoli, the situation is serious

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.