शहरं
Join us  
Trending Stories
1
फडणवीसांनी 'व्होट जिहाद'वरून चढवला हल्ला; शरद पवारांनी केला पलटवार, काय दिलं उत्तर?
2
भाजपाला मत देणाऱ्या मुस्लिमांना शोधून काढा, अन्...; महाविकास आघाडीवर गंभीर आरोप
3
महायुतीचे उमेदवार विलास भुमरे गॅलरीतून पडले, हात-पाय फ्रॅक्चर, उपचार सुरु
4
खळबळजनक! सलमान खानवर गोळीबार केल्यानंतर लॉरेन्स बिश्नोई गँगने केलेला 'हा' प्लॅन
5
'काकींना विचारणार, नातवाचा पुळका का आलाय?'; अजित पवारांना शरद पवारांनी दिले उत्तर
6
मनसे उमेदवाराला पाहताच कट्टर शिवसैनिकाच्या पत्नीला अश्रू अनावर; वरळीत काय घडलं?
7
भयंकर! नर्सने माचिसची काडी पेटवली अन् आग लागली; वॉर्डमध्ये नेमकं काय घडलं?
8
विधानसभा निवडणूक निकालानंतर सत्तेसोबत जाणार, प्रकाश आंबेडकरांचे मोठे संकेत
9
शाहिद कपूरच्या ५०० कोटींचा सिनेमा 'अश्वत्थामा'ला लागला ब्रेक! मोठं कारण आलं समोर
10
मुंबईतील २६/११ हल्ल्याचा मास्टरमाईंड बिनधास्त फिरतोय; पाकिस्तान जगाची दिशाभूल करतंय
11
काकींना विचारणार, एवढा काय पुळका आलाय त्या नातवाचा?; अजित पवारांचे विधान
12
हृदयद्रावक! ओव्हरटेक करताना क्रेटाची ऑटोला धडक; अपघातात वधू-वरांसह ७ जणांचा मृत्यू
13
"माझं पहिलं बाळ... पूर्ण भाजलं"; वंशाचा दिवा, आगीने हिरावून नेला, आई-वडिलांचा टाहो
14
रवींद्र वायकर यांना मोठा दिलासा, कथित भूखंड घोटाळा प्रकरण अखेर बंद, गैरसमजातून गुन्हा दाखल केला
15
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
16
Maharashtra Election 2024: "सगळीकडं जायचं, फक्त भुंकायचं"; आनंदराव अडसूळांचं नवनीत राणांवर टीकास्त्र
17
प्रियंका गांधींची आज कोल्हापुरात 'महाराष्ट्र स्वाभिमान' सभा, सभेची जय्यत तयारी
18
Mutual Funds नं 'या' १५ स्टॉक्समध्ये केली सर्वाधिक खरेदी, तुमच्याकडे आहेत का?
19
अश्नीर गोव्हरची Bigg Boss 18 मध्ये एन्ट्री; सलमान खानने 'दोगलापना'वर केली टीका म्हणाला- "तुम्ही जे चुकीचं..."
20
‘एक्स’वर १.१५ लाख युजर्सची फुली; अमेरिकी निवडणुकीत ट्रम्पना पाठिंबा देणे मस्क यांना महागात

दुर्घटनेनंतरही महावितरण निद्रिस्तच, घणसोलीसह ऐरोलीमध्ये परिस्थिती गंभीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 07, 2018 1:57 AM

कळवा व सानपाडा येथील विद्युत उपकेंद्रांना आग लागल्यानंतरही महावितरण प्रशासनाला जाग आलेली नाही. शहरामध्ये अनेक ठिकाणी विद्युत डीपी उघड्या असून, केबल अस्ताव्यस्त पसरल्या आहेत.

- अनंत पाटीलनवी मुंबई : कळवा व सानपाडा येथील विद्युत उपकेंद्रांना आग लागल्यानंतरही महावितरण प्रशासनाला जाग आलेली नाही. शहरामध्ये अनेक ठिकाणी विद्युत डीपी उघड्या असून, केबल अस्ताव्यस्त पसरल्या आहेत. ऐरोली ते घणसोली दरम्यानची स्थिती बिकट असून, वेळेत उपाययोजना केल्या नाहीत तर गंभीर अपघात होऊन जीवितहानी होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.घणसोली गावठाण, ऐरोली, दिवा कोळीवाडामधील प्रमुख रस्त्यांवर आणि चौकांमध्ये महावितरणने उभ्या केलेल्या विद्युत रोहित्रांच्या डीपी उघड्याच असल्याने शाळकरी विद्यार्थी, तसेच वाहनधारकांबरोबरच पादचाऱ्यांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. घणसोली विभागात २५पेक्षा जास्त बॉक्स उघडे असल्याचे निदर्शनास आले आहे. घणसोली परिसरातील नागरिकांनी महापालिका आणि महावितरणकडे अनेक तक्रारी करूनही त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. महापलिकेचे सहायक आयुक्त आणि विद्युत विभागाचे कनिष्ठ अभियंता सखाराम खाडे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले की, उघड्या डीपी बॉक्सची समस्या कायम असून, महापालिकेच्या वतीने लेखी तक्र ार करून आता तीन आठवड्यांचा कालावधी उलटूनही गेला असल्याचे सांगितले.दिवा-कोळीवाडा सेक्टर ९ येथे होळी मैदानाच्या शेजारी या अंतर्गत विजेचा दाब नियमन करण्यासाठी ठिकठिकाणी विद्युत रोहित्रांची उभारणी करण्यात आली आहे. येथील रोहित्रासह डीपी बॉक्स उघड्या अवस्थेत गेल्या अनेक वर्षांपासून आहे. घणसोली गावदेवी मंदिर, कोळीवाडा, शेतकरी शिक्षण संस्थेचे महाविद्यालय, पाटीलआळी, चिंचआळी, दत्तनगर, तळवली गाव, नोसिलनाका सेक्टर २१, छत्रपती शिवाजी तलाव, खदान तलाव, वैभव पतपेढी जवळ, रबाळे स्मशानभूमी, वीटभट्टी रोड, रबाळे रेल्वेस्थानक, गोठीवली महावितरण कार्यालयाजवळ, मासळी मार्केट साईबाबा मंदिर, गोल्डननगर, गोठीवली विठ्ठल-रखुमाई मंदिर यांच्यासह एकूण २५ डीपी बॉक्सची परिस्थिती अत्यंत गंभीर आहे. डीपीतील वीज तारा, उघडे फ्युज, सर्वसामान्य नागरिकांच्या हाताला येतील, अशा पद्धतीने हे बॉक्स आहेत, तसेच रस्त्याच्या कडेला एखादा अपघात झाला तर उघड्या डीपीवर वाहन आदळून मोठी घटनाही घडू शकते.डीपीचे दरवाजे तारेने बांधलेले असल्याचे पाहावयास मिळतात. दिवा-कोळीवाडा होळी मैदान परिसरातील डीपीचे आणि जनित्रांचे दरवाजे वर्षाचे बाराही महिने खुलेच असल्यामुळे मोठी जीवितहानी होण्याची शक्यता टाळता येत नाही.उघड्या डीपी बॉक्स आणि ओव्हरहेड जीर्ण केबल्स संदर्भात घणसोली विभागातील शेकडो लोकांच्या तक्र ारी महापालिकेकडे आलेल्या आहेत. त्यानुसार आम्ही ५० ठिकाणी सर्वेक्षण केले असता, यात २५ ठिकाणी नागरिकांच्या जीवितास धोका असल्याची गंभीर परिस्थिती आढळून आल्याने यासंदर्भात वीज महावितरण कंपनीकडे दुरु स्तीबाबत तीन आठवड्यापूर्वी लेखी तक्र ार केली आहे.- दत्तात्रेय नागरे, सहायक आयुक्त, घणसोली, महापालिकानवी मुंबई महापलिकेच्या वतीने तसेच नागरिकांच्या वतीने उघड्या डीपी बॉक्स विषयी महावितरणकडे लेखी तक्र ार करण्यात आलेली आहे. दुरु स्तीसाठी ठेकेदारामार्फत डीपी बॉक्स लॉकिंगचे आणि उघड्या केबल्स नव्याने बसविण्याचे काम सुरू आहे. येत्या काही दिवसांतच हे काम पूर्ण होणार असल्यामुळे उघड्या डीपीचा प्रश्न कायमचा सुटेल.- दीपक शिंदे, सहायक अभियंता, वीज महावितरण ऐरोली विभाग.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई