पावसाळ्यानंतर मनपा उचलणार कचरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 26, 2018 03:28 AM2018-05-26T03:28:36+5:302018-05-26T03:28:36+5:30

लवकरच निविदा प्रसिद्ध होणार : पनवेल महापालिकेसह सिडकोची बैठक

After the monsoon, municipal waste will take up the garbage | पावसाळ्यानंतर मनपा उचलणार कचरा

पावसाळ्यानंतर मनपा उचलणार कचरा

Next

कळंबोली : सिडको वसाहतींमधील कचरा पावसाळ्यानंतर पनवेल महानगरपालिका उचलणार आहे. आचारसंहिता संपल्यानंतर या कामाच्या निविदा प्रसिध्द केली जाईल त्यानंतर एजन्सी नियुक्त करण्यात येणार आहे. शुक्र वारी सिडको आणि महापालिकेची संयुक्त बैठक पार पडली.
पनवेल महानगरपालिका स्थापन झाल्यानंतर नवीन पनवेल, कळंबोली, कामोठे, खारघर, तळोजा, नावडे नोडमधील घनकचरा व्यवस्थापन हस्तांतरित करून घेण्याचा तगादा सिडकोने लावला होता. याकरिता अनेकदा मनपाला मुदतवाढ देण्यात आली होती. नव्याने निर्माण झालेल्या महापालिकेकडे निधी, मनुष्यबळाची कमतरता असल्याने सध्या तरी ही सेवा आम्हाला घेता येणार नाही अशी भूमिका तत्कालीन आयुक्त डॉ. सुधाकर शिंदे यांनी घेतली होती. याकरिता नगरविकास विभागाला मध्यस्थी करावी लागली होती. धोरण तयार होईपर्यंत कचरा सिडको उचलेल मात्र त्याचे पैसे महापालिका अदा करेल असा मध्य शासनाने काढला होता. त्यामुळे घनकचरा व्यवस्थापनापोटी आलेला खर्चाची मागणी सिडकोने मनपाकडे केली होती. एकूण ११ कोटी थकबाकी देण्याबाबत पत्र सुध्दा देण्यात आले आहे. यापोटी सिडकोला पैसे अदा करण्यापेक्षा ही सेवा हस्तांतरित करून घेण्याबाबत प्रशासनाने पुढाकार घेतला आहे. त्यानुसार आज सिडको भवन येथे सहव्यवस्थापकीय संचालिका प्राजक्ता लवंगारे-वर्मा, आयुक्त गणेश देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत संयुक्त बैठक पार पडली. यावेळी सिडकोचे मुख्य अभियंता केशव वरखेडकर, अधीक्षक अभियंता सीताराम रोकडे, मुख्य आरोग्य अधिकारी डॉ. बी.एस बावस्कर, नगर नियोजन सेवा विभागाचे व्यवस्थापक टी.एल.परब, मनपा उपायुक्त जमीर लेंगरेकर उपस्थित होते. साधारणपणे आॅक्टोबर महिन्यात महापालिका वसाहतींतील कचरा उचलण्यास सुरुवात करेल अशी माहिती मिळाली आहे.

महिन्याला
दीड कोटी भार
सिडको वसाहतीत एकूण साडेतीनशे टन कचरा निर्माण होतो. या कचऱ्याची तळोजा क्षेपणभूमीवर विल्हेवाट लावली जाते.कचरा जमा करून तो घंटागाडीव्दारे वाहून नेणे त्याचबरोबर त्याचे वर्गीकरण करणे याकरिता महिन्याला दीड कोटी रुपये खर्च महापालिकेला करावा लागणार आहे.

Web Title: After the monsoon, municipal waste will take up the garbage

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :cidcoसिडको