शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : पारनेरमध्ये मोठी घडामोड, निलेश लंकेंच्या कट्टर विरोधकाचा अजित पवार गटाच्या उमेदवाराला पाठिंबा
2
Virat Kohli Glenn McGrath, IND vs AUS 1st Test: विराट कोहलीवर दबाव कसा आणायचा? 'द ग्रेट' ग्लेन मॅकग्राने ऑस्ट्रेलियन गोलंदाजांना दिला 'कानमंत्र'
3
हृदयद्रावक! दुसऱ्यांच्या मुलांना वाचवण्यासाठी जीव धोक्यात घातला, पण स्वतःच्या जुळ्या मुली गमावल्या
4
मुसलमान पुरोगामी, त्यांनी उद्धव ठाकरेंची ही जागा वाचवली; अबु आझमींचा भाजपावर हल्लाबोल
5
PM मोदींच्या नावे आणखी एक उपलब्धी; नायजेरियाच्या सर्वोच्च पुरस्काराने सन्मान
6
श्रीदेवीसोबत कसं होतं नातं? माधुरी दीक्षितचा खुलासा; म्हणाली, "आम्ही कधीच एकत्र..."
7
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'दगडा पेक्षा वीट बरी' प्रमाणे महाविकास आघाडी पेक्षा महायुती बरी; लक्ष्मण हाकेंनी स्पष्टच सांगितलं
8
"माझा मुलगा ॲनिमलमधील रणबीरसारखा", अल्लू अर्जुनचं लेकाबाबत वक्तव्य, म्हणाला- "जर मी त्याच्या आईबरोबर..."
9
'आप'ला मोठा धक्का, मंत्री कैलाश गेहलोत यांनी दिला पदाचा राजीनामा, पक्षालाही ठोकला रामराम 
10
भारताकडून हायपरसॉनिक क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी, मोजक्या देशांच्या यादीत मिळवलं स्थान
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : बारामतीमध्ये शरद पवारांच्या बॅगांची तपासणी; अधिकाऱ्यांनी हेलिकॉप्टरमधील साहित्याची केली तपासणी
12
अजित पवार प्रचंड जातीवादी माणूस, त्यांनी कायम...; जितेंद्र आव्हाडांचा गंभीर आरोप
13
"मणिपुर ना एक है, ना सेफ है", हिंसाचारावरून मल्लिकार्जुन खरगेंचा PM नरेंद्र मोदींवर निशाणा
14
मुंबईमध्ये अपक्षांना थारा नाहीच! ३६ मतदारसंघांतील आकेडवारी काय सांगते?
15
मुंबई : अभिनेत्याच्या पत्नीला आला एक मेसेज; सायबर ठगाने कसा घातला गंडा?
16
मुंबईवरून आलेल्या ट्रॅव्हल्समध्ये सापडली कोट्यवधीची रक्कम, मोजदाद सुरू; पोलिसांनी ठेवला पहारा
17
"मला जेलमध्ये टाकण्याची भाषा करू नका"; एकनाथ शिंदेंनी थोपटले दंड
18
Chalisgaon Vidhan Sabha: जुन्या पक्क्या मित्रांमध्ये रंगली आहे कट्टर लढत!
19
निष्काळजीपणा की कट? रुग्णालयातील NICU वॉर्डमध्ये कशी लागली आग; समोर आला रिपोर्ट
20
देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेले हे निर्णय विधानसभा निवडणुकीत ठरू शकतात गेमचेंजर

सिडकोच्या अतिक्रमण कारवाईला उसर्ली ग्रामस्थांचा विरोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 31, 2019 12:07 AM

अतिक्रमणविरोधी पथकाला रिकाम्या हाती परतावे लागले

पनवेल : तालुक्यातील उसर्ली गावातील ग्रामस्थांच्या घरांवर कारवाई करण्यासाठी गेलेल्या सिडकोच्याअतिक्रमण विरोधी पथकाला बुधवारी रिकाम्या हाती परतावे लागले. नैना क्षेत्रात सिडकोने अनधिकृत बांधकामांना निष्कासित करण्याच्या मोहिमेला वेग दिला आहे. याकरिताच ही तोडक कारवाई नियोजित करण्यात आली होती. मात्र ग्रामस्थांचा विरोध व अपुऱ्या पोलीसबळामुळे सिडकोला कारवाई पुढे ढकलावी लागली.उसर्ली गावात नव्याने ही बांधकामे उभारण्यात आली होती. या बांधकामांची उभारणी करताना सिडकोच्या मार्फत कोणतीच परवानगी घेतली नसल्याने या बांधकामावर कारवाईसाठी सिडको प्रशासन पोलीस फौजफाट्यासह याठिकाणी दाखल झाले होते. एकूण चार इमारतींच्या बांधकामांना अनधिकृत असल्याने निष्कासित करण्याचे नियोजित होते. ग्रामस्थांचा विरोध व खांदेश्वर अपुरे पोलीसबळ यामुळे संबंधित कारवाई पुढे ढकलण्यात आली असल्याची माहिती सिडकोचे अनधिकृत बांधकाम नियंत्रक विभागाचे अधिकारी एस.आर.राठोड यांनी दिली. यावेळी विरोध करण्यासाठी रहिवाशांनी रस्त्यांवर गाड्यांची पार्किंग केली होती. ग्रामस्थांच्या विरोधामुळे कारवाई पुढे ढकलण्यात आल्याची माहिती एस. आर. राठोड यांनी दिली. नैना क्षेत्रातील अनधिकृत बांधकामांना सिडकोने टार्गेट केले आहे. नुकतीच हरिग्राम याठिकाणी तीनशे घरांची अनधिकृत चाळ सिडकोने पाडली होती.चुकीच्या धोरणाचा त्रासनैना प्रकल्प लादून सिडकोने स्थानिक प्रकल्पग्रस्तांवर अन्याय केला आहे. केवळ प्रकल्पग्रस्त नसून बाहेरील गरीब गरजंूनी देखील याठिकाणी घरे खरेदी केली आहेत. लाखो रुपयांचे कर्ज त्यांच्या अंगावर असताना सिडको इमारत पूर्ण झाल्यावर कारवाई करीत असेल तर अनेकांना आपला जीव द्यावा लागेल अशी प्रतिक्रि या पनवेल महानगर पालिकेचे विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे यांनी दिली.शेकापचा नैना क्षेत्रातील कारवाईला विरोधएकीकडे शेकडो प्रकल्पग्रस्तांना सीसी, ओसी देण्यास सिडको उदासीनता दाखवत आहे. त्यामुळे येथील रहिवासी गरजेपोटी घरे बांधत आहेत. त्यामुळे सिडकोने आपले धोरण स्पष्ट करावे त्यानंतरच नैना क्षेत्रात कारवाई करावी अशी भूमिका शेकाप नेते आर.डी. घरत व विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे यांनी घेतली.

टॅग्स :Enchroachmentअतिक्रमणcidcoसिडको