पनवेल कृषी उत्पन्न बाजार समितीचा सभापती नारायण घरत, उपसभापती सुनील सोनावणे

By वैभव गायकर | Published: May 24, 2023 12:10 PM2023-05-24T12:10:31+5:302023-05-24T12:11:29+5:30

पनवेल कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळाची निवडणूक झाली.१८ संचालक पदांसाठी झालेल्या निवडणुकीत महाविकास आघाडीने १७ जागांवर बिनविरोध विजय मिळवला,महाविकास आघाडीने एक हाती सत्ता घेतली.

Agriculture Produce Market Committee Chairman Narayan Gharat Deputy Chairman Sunil Sonawane in panvel | पनवेल कृषी उत्पन्न बाजार समितीचा सभापती नारायण घरत, उपसभापती सुनील सोनावणे

पनवेल कृषी उत्पन्न बाजार समितीचा सभापती नारायण घरत, उपसभापती सुनील सोनावणे

googlenewsNext

पनवेल: पनवेलच्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती-उपसभापती पदासाठीची निवडणूक लागली दि.24 रोजी पार पडल्या. निवडणूक कार्यक्रम प्राधिकृत अध्यासी अधिकारी भारती काटुळे यांनी यावेळी काम पाहिले.पनवेल  कृषी उत्पन्न बाजार समितीचा सभापती नारायण घरत तर  उपसभापती सुनील सोनावणे यांची निवड करण्यात आली.

पनवेल कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळाची निवडणूक झाली.१८ संचालक पदांसाठी झालेल्या निवडणुकीत महाविकास आघाडीने १७ जागांवर बिनविरोध विजय मिळवला,महाविकास आघाडीने एक हाती सत्ता घेतली. यावेळी माजी आमदार बाळाराम पाटील,माजी आमदार मनोहर पाटील,जे एम म्हात्रे,सुदाम पाटील,काशिनाथ पाटील आदींसह महाविकास आघाडीचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.यावेळी पनवेल शहरात विजयी मिरवणूक काढण्यात आली.

Web Title: Agriculture Produce Market Committee Chairman Narayan Gharat Deputy Chairman Sunil Sonawane in panvel

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :panvelपनवेल