मुंबईतील हवा समाधानकारक, नवी मुंबईतील वातावरण प्रदूषित

By ऑनलाइन लोकमत | Published: November 14, 2019 05:41 AM2019-11-14T05:41:42+5:302019-11-14T05:41:49+5:30

दिल्लीमध्ये बुधवारी सूक्ष्म प्रदूषक कणांचे प्रमाण ४७२ एवढे नोंदविण्यात आले

 The air in Mumbai is satisfactory, the atmosphere in Navi Mumbai polluted | मुंबईतील हवा समाधानकारक, नवी मुंबईतील वातावरण प्रदूषित

मुंबईतील हवा समाधानकारक, नवी मुंबईतील वातावरण प्रदूषित

Next

मुंबई : दिल्लीमध्ये बुधवारी सूक्ष्म प्रदूषक कणांचे प्रमाण ४७२ एवढे नोंदविण्यात आले असून, महिन्याभरानंतरही दिल्ली आणि लगतच्या परिसराचा श्वास कोंडलेला आहे. आता केवळ दिल्लीच नाही, तर मुंबईसह नवी मुंबईही दिवसागणिक प्रदूषित होत असून, येथे उठत असलेल्या धूलिकणांमुळे नागरिकांचा श्वास कोंडला आहे. महत्त्वाचे म्हणजे, बुधवारी मुंबईत ठिकठिकाणची हवा समाधानकारक नोंदविण्यात आली असतानाच, मुंबईच्या तुलनेत नवी मुंबई प्रदूषित नोंदविण्यात आली आहे.
नवी मुंबईत सूक्ष्म प्रदूषक कणांचे प्रमाण ३२१ पार्टीक्युलेट मॅटर आहे, तर मुंबईत ते ११४ पार्टीक्युलेट मॅटर आहे. दिल्लीसह लगतच्या परिसरातील वायुप्रदूषणाचे प्रमाण कमी करण्यासाठी तेथील सरकार सातत्याने प्रयत्नशील आहे. मात्र, अद्यापही त्यांना पुरेसे यश आलेले नाही. दिल्ली वरचेवर प्रदूषित होत असतानाच दुसरीकडे मुंबईसह लगतच्या परिसरातील हवादेखील प्रदूषित होत असल्याची नोंद ‘सफर’ या हवेची गुणवत्ता मोजत असलेल्या संकेतस्थळावर करण्यात आली आहे.
मुंबई, नवी मुंंबईच्या या पूर्वीच्या नोंदी पाहिल्या असता, मुंबईतील बहुतांश म्हणजे अंधेरी, बीकेसी आणि माझगावसारखी ठिकाणे प्रदूषित म्हणून नोंदविली जात होती. मात्र, मध्यंतरी चक्रीवादळामुळे पडलेल्या पावसानंतर येथील हवेची गुणवत्ता समाधानकारक नोंदविण्यात आली.
भारतीय हवामान शास्त्र विभागानेही याची नोंद घेत, पावसामुळे येथील धूलिकणांचे प्रमाण कमी झाल्याचे म्हटले होते. मात्र, असे असले, तरीदेखील भविष्यात थांबलेला पाऊस आणि वाहनांच्या धुरामुळे धूलिकणांत वाढ होईल आणि तापमानात वाढ होईल, अशीही शक्यता हवामान खात्याने वर्तविली होती. ही शक्यता वर्तवितानाच थंडीच्या ऋतूमध्ये धूलिकणांचे प्रमाण वाढेल, अशीही शक्यता वर्तविण्यात आली होती. दरम्यान, दिल्लीसारखी स्थिती मुंबईत नसून, समुद्राहून वाहते वारे मुंबईच्या हवेतील गुणवत्ता समाधानकारक ठेवण्यास मदत करत आहेत, याचा दाखला हवामान खात्याने दिला आहे.
>...यामुळेच बिघडले नवी मुंबईचे वातावरण
नवी मुंबईमध्ये सातत्याने सुरू असलेली बांधकामे, कारखाने, खाणकामे हे घटक हवेतील धूलिकणांमध्ये भर घालतात. केवळ हेच घटक नाहीत, तर वाहनांचे वाढते प्रमाण आणि त्यामुळे होणारे प्रदूषणही वातावरण आणखी वाईट करत आहे.
हवेची गुणवत्ता
(सूक्ष्म प्रदूषक कणांचे प्रमाण पार्टीक्युलेट मॅटरमध्ये)
दिल्ली - ४७२ तीव्र
नवी मुंबई - ३२१ अत्यंत वाईट
अहमदाबाद - १९४ अंत्यत वाईट
मुंबई - ११४ वाईट
पुणे - ८८ मध्यम
चांगली : ० ते ३०
समाधानकारक : ३० ते ६०
मध्यम : ६० ते ९०
वाईट : ९० ते १२०
अत्यंत वाईट : १२० ते २५०
तीव्र : २५० ते ३८०
नवी मुंबई - ३२१ अत्यंत वाईट
बोरीवली - ९८ समाधानकारक
मालाड - ९१ समाधानकारक
भांडुप - ६३ समाधानकारक
अंधेरी - १२२ मध्यम
बीकेसी - १९९ मध्यम
चेंबूर - ७० समाधानकारक
वरळी - १८ चांगली
माझगाव - ९५ समाधानकारक

Web Title:  The air in Mumbai is satisfactory, the atmosphere in Navi Mumbai polluted

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.