शहरं
Join us  
Trending Stories
1
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
2
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
3
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
4
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
5
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
6
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
7
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
8
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
9
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
10
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
11
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
12
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
13
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले
14
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील महायुतीच्या विजयानंतर, काँग्रेसची मोठी घोषणा; देशभरात खास मोहीम चालवणार 
15
"तुम्ही जिंकता तेव्हा ईव्हीएम चांगले अन् पराभूत झाले, तर..."; सुप्रीम कोर्टाने पिळले कान
16
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
17
अपघातानंतर पहिल्यांदाच कश्मिरा शाहने शेअर केला Video; नाकाला झालेली दुखापत
18
TV, OTT, AI सगळं एकाच ठिकाणी; टीव्हीसोबतच मिळणार सगळ्याचं 'सबस्क्रिप्शन'
19
Neha Bhasin : "अंधाऱ्या खोलीत बसते, माझं वजन १० किलोने वाढलं"; नेहा भसीन देतेय गंभीर आजाराशी झुंज
20
OLA चा धमाका! लॉन्च केली नवीन EV स्कूटर रेंज; किंमत फक्त ₹39,999 पासून सुरू...

नवी मुंबईतून पुढच्या वर्षीपासून आकाशात झेपावणार विमान: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

By ऑनलाइन लोकमत | Published: June 08, 2023 6:26 AM

देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत केली हेलिकॉप्टरद्वारे पाहणी

लोकमत न्यूज नेटवर्क, नवी मुंबई : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ केवळ राज्याच्या नव्हे तर देशाच्या दृष्टीने महत्त्वाचे विमानतळ ठरणार आहे. त्याच्या मार्गातील अडचणी दूर करून ते नियोजित २०२४ मध्ये वेळेत वाहतुकीसाठी खुले होण्यासाठी राज्य शासन आवश्यक ते सर्व सहकार्य करेल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बुधवारी सकाळी केले. 

उलवे येथील विमानतळाच्या हेलिकॉप्टरद्वारे पाहणीनंतर, अदानी समूहाने सादरीकरण केले. त्यानंतर मुख्यमंत्री बोलत होते. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, रायगडचे पालकमंत्री उदय सामंत, खा. श्रीरंग बारणे, खा. डॉ. श्रीकांत शिंदे, आ. महेश बालदी, मंदा म्हात्रे, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणचे (एमएमआरडीए) आयुक्त संजय मुखर्जी, विभागीय आयुक्त डॉ. महेंद्र कल्याणकर, सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक अनिल डिग्गीकर, सिडकोचे सहसंचालक कैलास शिंदे, जिल्हाधिकारी डॉ. योगेश म्हसे, नवी मुंबई पालिका आयुक्त राजेश नार्वेकर, पनवेल पालिका आयुक्त गणेश देशमुख आदी यावेळी उपस्थित होते.

“नवी मुंबई विमानतळ हे पुणे, मुंबई, गोवा यांच्यासाठी महत्त्वाचे आहे.  प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते विमानतळाचे भूमिपूजन झाले होते. उद्घाटनदेखील त्यांच्या हस्ते होईल. विमानतळ उभारणीचे काम वेगाने सुरू आहे. हा प्रकल्प लवकरच लोकांसाठी खुला होईल, यासाठी सर्व प्रयत्न सुरू आहेत” असेही  मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले.

नवी मुंबई विमानतळाचे काम अतिशय वेगाने सुरू असल्याचे सांगून उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी २०२४ पर्यंत ते सुरू करण्याच्या दृष्टीने विमानतळाच्या कामात येणाऱ्या अडचणी सोडवून कामाला अधिक गती द्यावी, हा आजच्या पाहणीचा उद्देश आहे. 

विविध दळणवळणाची साधने या विमानतळाला जोडण्यात येणार असल्याने ते देशातील अद्वितीय असे विमानतळ म्हणून गणले जाईल. विमानतळाच्या कामाची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हॅलीकॉप्टरद्वारे पाहणी केली. यावेळी एमएमआरडीए आयुक्त संजय मुखर्जीही उपस्थित होते. त्यानंतर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी धावपट्टीचीही पाहणी केली.

दरवर्षी ९ कोटी प्रवासी वाहतूक

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरील २२ किलोमीटरच्या सिलिंक महत्त्वाचा दुवा ठरेल.  दरवर्षी ९ कोटी प्रवासी वाहतूक होईल.  म्हणूनच मोठ्या शहरासाठी हा प्रकल्प लोकांना दिलासा देणारा आहे. याची क्षमता वाढविण्यासाठी विविध परवानग्या मिळविण्याची कामे युद्धपातळीवर सुरू आहेत. पहिल्या टप्प्यात चार टर्मिनल असून ४२ विमाने उभी राहतील. ५,५०० क्षमतेचे कार पार्किंग असेल. हे विमानतळ ११.४ किलोमीटर परिसरात उभे राहत असून दोन धावपट्ट्या असतील.

 

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदेDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस