ऐरोलीतील टी भारत बिजली जंक्शन अंडरपास आज (१५ एप्रिल २०२५) रात्रीपासून दोन दिवस वाहतुकीसाठी बंद राहणार आहे. ऐरोली-मुलुंड खाडी ब्रिज येथील अग्निशमन दलाच्या इमारतीजवळ प्रबुद्ध चौकात रोड ओव्हर ब्रिजच्या उद्घाटन केले जाणार असल्याने हा ब्रिज बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. सलग दोन रात्री सर्व प्रकारची वाहने तात्पुरती बंद असून त्यानुसार वाहतुकीत बदलही करण्यात येणार आहेत.
रबाळे वाहतूक विभागाने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, टी भारत बिजली जंक्शन अंडरपास १५ एप्रिल रोजी रात्री १०.०० वा. ते १६ एप्रिल रोजी सकाळी ०७.०० वाजेपर्यंत वाहतुकीसाठी बंद राहणार आहे. त्यानंतर दुसऱ्या दिवशी १६ एप्रिल रोजी १०.०० वाजता हा रस्ता पुन्हा बंद केला जाईल आणि १७ एप्रिलला सकाळी ०७.०० वाजता वाहतुकीसाठी सुरू होईल. मोटार वाहन कायद्यातील तरतुदी आणि महाराष्ट्र सरकारच्या गृह विभागाच्या अधिसूचनेनुसार नवी मुंबईचे पोलिस उपायुक्त (वाहतूक) तिरुपती काकडे यांना देण्यात आलेल्या अधिकारानुसार हा आदेश लागू करण्यात आला. इन्फ्रा प्रोजेक्ट्स लिमिटेड द्वारे चालवल्या जाणाऱ्या वाहनांव्यतिरिक्त सर्व वाहनांना हे निर्बंध लागू आहेत.
'हे' आहेत पर्यायी मार्ग- बेलापूर-ठाणे रोडवरून भारत बिजली सिग्नलमार्गे ऐरोली सेक्टर १ ते ५ कडे जाणाऱ्या वाहनांनी ऐरोली स्टेशन अंडरपासवर डावीकडे वळावे.- भारत बिजली येथून सेक्टर १ ते ५ मध्ये येणाऱ्या वाहनांनी टी-पॉइंटने पुढे जावे आणि खेडेकर चौकात उजवीकडे वळून पुढे जावे.