महाराष्ट्राचा ऐतिहासिक वारसा जपणारे अजिंठा सांस्कृतिक प्रतिष्ठान

By वैभव गायकर | Published: August 13, 2023 02:39 PM2023-08-13T14:39:02+5:302023-08-13T14:40:47+5:30

पुरोगामी महाराष्ट्राला एक मोठा ऐतिहासिक वारसा लाभला आहे.

ajantha cultural foundation preserving the historical heritage of maharashtra | महाराष्ट्राचा ऐतिहासिक वारसा जपणारे अजिंठा सांस्कृतिक प्रतिष्ठान

महाराष्ट्राचा ऐतिहासिक वारसा जपणारे अजिंठा सांस्कृतिक प्रतिष्ठान

googlenewsNext

- वैभव गायकर

पुरोगामी महाराष्ट्राला एक मोठा ऐतिहासिक वारसा लाभला आहे. हा वारसा जपणे हे सर्वांचेच आद्य कर्तव्य आहे. हाच वारसा जपण्याचे ध्येय उराशी बाळगून अजिंठा सांस्कृतिक प्रतिष्ठानची स्थापना १ जानेवारी १९९१ रोजी करण्यात आली. कामानिमित्त मुंबईत स्थायिक झालेले विशेषतः कर्नाटक, तेलंगणा, मराठवाडा भागातील रहिवासी या प्रतिष्ठानसोबत जोडले गेले आहेत. ऐरोली, नवी मुंबई या ठिकाणी प्रतिष्ठानचे नोंदणीकृत कार्यालय आहे.

६१ आजीव सभासद असलेल्या या प्रतिष्ठानमध्ये ३२१ सर्वसाधारण सभासद आहेत. महाराष्ट्राचा सांस्कृतिक, ऐतिहासिक वारसा आणि लेणी, विहार, मंदिर यांचा अभ्यासक्रम आणि जनहितासाठी त्यांचे प्रकाशन करणे आदी उपक्रम या संस्थेचे सभासद मुंबई उपनगर, नवी मुंबई, पनवेल परिसरात राबवत असतात. या उपक्रमाचाच भाग म्हणून दरवर्षी अजिंठा, एलोरा, काळाराम मंदिर, भाजा कार्ले लेणी आणि कान्हेरी लेणी आदी ठिकाणची सहल आयोजित करून मुंबईत या संस्थेच्या सभासदांना तसेच निवडक विद्यार्थ्यांना महाराष्ट्राची संस्कृती पाहण्याची संधी उपलब्ध करून दिली जाते. दरवर्षी हैदराबाद मुक्ती संग्रामातील (कर्नाटक, तेलंगणा आणि मराठवाडा) वारसांचा सन्मान करणे, हैदराबाद संस्थानातून मुंबई महानगरात स्थायिक झालेल्या कन्नड, तेलुगु, मराठी भाषिकांचा संयुक्त मेळावा आयोजित करणे, आंतरप्रांतीय  बहुभाषिक स्नेहमेळावा आयोजित करणे आदी कार्यक्रम दरवर्षी मोठ्या संख्येने या ठिकाणी राबविले जातात.

कर्नाटक, तेलंगणा, मराठवाडा भागातील मुंबई निवासी मराठी भाषिकांना मुंबई प्रातांत वैद्यकीय मदत व शिक्षणासाठी आर्थिक मदत करणे, शालेय - महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा सत्कार, आपत्कालीन परिस्थितीत सापडलेल्या नागरिकांना प्रासंगिक मदत करणे, महिलांना सर्व क्षेत्रात संधीतील समानता प्राप्त करून देण्यासाठी विशेष व्याख्यान वर्ग परिसंवाद, करिअरच्या संधी तसेच विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्याचे काम प्रतिष्ठान आवर्जून करीत असते. विविध क्षेत्रांत विशेष योगदान दिलेल्या महिला, पुरुषांचा गौरव, सन्मान, सत्कार करणे.

सीमा भागातील रहिवाशांना आधार 

कर्नाटक, तेलंगणा या महाराष्ट्राच्या सीमा भागात मराठी भाषिक वसलेले आहेत. कामानिमित्त अथवा नोकरीसाठी मुंबईत आल्यावर प्रत्येकाला गावाची आठवण येतच असते. अशा वेळी अजिंठा सांस्कृतिक प्रतिष्ठानचे पदाधिकारी आवर्जून गावाकडील माणसांना मदतीचा हात देऊन मुंबईसारख्या भागात एक प्रकारचा धीर देत असतात.
कार्यकारिणी 
अध्यक्ष  
कमलताई शंकर हावरगेकर
सरचिटणीस 
डाॅ. प्रवीण डी. सूर्यवंशी
कोषाध्यक्ष
छाया भगवान कांबळे
सल्लागार 
धम्म मेघा
सदस्य 
विमल श्रावणकुमार, अमरचंद हाडोळतीकर, जयश्री एन. सूर्यवंशी गुत्तीकर, अशोक लगाडे

 

Web Title: ajantha cultural foundation preserving the historical heritage of maharashtra

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.