मद्यपी पर्यटकांची पोलिसांनाही धक्काबुक्की

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2017 03:08 AM2017-07-19T03:08:10+5:302017-07-19T03:08:10+5:30

देहरंग धरण परिसरामध्ये मद्यपान करून धिंगाणा घालणाऱ्या पर्यटकांनी पोलीस कर्मचाऱ्यालाही धक्काबुक्की केल्याचा प्रकार निदर्शनास आला आहे. वरिष्ठ पोलीस

Alcoholic tourists scare policemen | मद्यपी पर्यटकांची पोलिसांनाही धक्काबुक्की

मद्यपी पर्यटकांची पोलिसांनाही धक्काबुक्की

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
नवी मुंबई : देहरंग धरण परिसरामध्ये मद्यपान करून धिंगाणा घालणाऱ्या पर्यटकांनी पोलीस कर्मचाऱ्यालाही धक्काबुक्की केल्याचा प्रकार निदर्शनास आला आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक बसलेल्या कारची काच फोडून एक व्यक्तीला जखमीही केले असून याप्रकरणी नवीन पनवेल पोलीस स्टेशनमध्ये १९ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गुन्हा दाखल केलेल्यांमध्ये संतोष डोंगरे, कर्णा तरे, अजिंक्य साळवे, भरत पाटील, अशोक जगदाळे, मुकेश पाटील, आकाश गजरे, रामनंद जयस्वाल, रूपेश भंडारे, नरेश पाटील, विष्णू पाटील, रोहन शिंदे, रूपेश दिघोडकर, शशिकांत खळे, दिनेश डोंगरे, संदीप गायकवाड, बाळू जोगदंड, मिलिंद कारंडे व इतर अजून एकाचा समावेश आहे. याप्रकरणी पोलीस नाईक शैलेश ठाकूर यांनी तक्रार दिली आहे. ठाकूर यांची देहरंग धरण परिसरामध्ये बंदोबस्तासाठी नियुक्ती केली होती. पनवेल धोदाणी डांबरी रोडवर काही पर्यटक मद्यपान करून धिंगाणा घालत असल्याचे निदर्शनास आले. त्यांना समजावूनही त्यांनी ऐकले नाही. तेथे पाहणी करण्यासाठी ुआलेल्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक मालोजी शिंदे बसलेल्या इनोव्हा कारची काच फोडली. संतोष उत्तम डोंगरे या तरूणाने हाताबुक्क्यांनी काच फोडली. यावेळी तरूणाच्या हातालाही दुखापत झाली होती.
पर्यटक ऐकत नसल्याने व गोंधळ घालत असल्याने फोन करून जादा बंदोबस्त मागविण्यात आला. पोलिसांनी घटनास्थळावरून दंगेखोरांना ताब्यात घेतले आहे. या प्रकरणी गोंधळ घालणाऱ्यांविरोधात नवीन पनवेल पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: Alcoholic tourists scare policemen

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.