नवी मुंबई - ट्रान्स हार्बर मार्गावर तुर्भे येथे रेल्वेरुळावर अल्युमिनियम ची शिडी ठेवल्याचा प्रकार रात्री 6.45 वाजण्याच्या सुमारास घडला. ठाणेकडे जाणारी लोकलच्या रुळावर हि शिडी ठेवण्यात आली होती. वेळीच मोटरमन ने रेल्वे थांबवल्याने दुर्घटना घडली. मात्र रुळावरील शिडी निदर्शनास आल्यानंतर रेल्वे थांबवेपर्यंत पहिले एक चाक त्यावरून गेल्याने शिडी तुटली. त्यापैकी एक भाग मोटरमनने सोबत नेवून ठाणे रेल्वे पोलिसांच्या ताब्यात दिला.
घटनेची माहिती मिळताच वाशी रेल्वे पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. याप्रकरणी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आल्याचे वाशी रेल्वेचे वरिष्ठ निरीक्षक नंदकुमार सस्ते यांनी सांगितले. यापूर्वी देखील ट्रान्स हार्बर मार्गावर तुर्भे येथेच रुळावर शिडी ठेवल्याचा प्रकार घडलेला आहे. त्यामुळे परिसरातील गुन्हेगारी प्रवृत्तीच्या तरुणांकडून रेल्वेचा अपघात घडवण्याच्या उद्देशाने असे प्रकार केले जात असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.